मराठवाड्यातील ८ जिल्ह्यात केवळ ३३ हजार ७०० कुणबी नोंदी सापडल्या, माहिती अधिकारातून माहिती समोर

17

जालना, २० फेब्रुवारी २०२४ : लाखोंच्या संख्येने मराठ्यांचे कुणबीकरण केलं जात आहे, लाखोंच्या संख्येने प्रमाणपत्र वाटप केले जात आहे, अशा प्रकारचा प्रचार राज्यातील सत्ताधारी वर्गातूनच केला जात आहे. परंतु वस्तुस्थिती तशी नव्हती, म्हणून मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक डॉ. संजय लाखे पाटील यांनी याबाबत माहिती अधिकार अर्ज केला होता. आता या मागितलेल्या माहिती अधिकारातून खरी माहिती समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगर विभागीय महसूल आयुक्तालयाने या माहितीला उत्तर देत सांगितले आहे कि, मराठवाड्यातील ८ जिल्ह्यात केवळ ३३ हजार ७०० कुणबी नोंदी आढळून आल्या आहेत आणि त्यापैकी ३० हजार लोकांना प्रमाणपत्र मिळाले आहेत. पण न्या. संदीप शिंदे यांची कमिटी नेमल्यापासून आजपर्यंत राज्यात एकही कुणबी प्रमाणपत्राची वैधता झालेली नसल्याचे मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक डॉ. संजय लाखे पाटील यांनी म्हटलं आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : विजय साळी