मुंबई, दि. ८ मे २०२०: लॉकडाऊनमुळे राज्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये परीक्षांसंबंधी संभ्रम निर्माण झाला होता. त्यामुळे या परिक्षांबाबत राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षा सोडून अन्य सर्व परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत, अशी घोषणाच उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली आहे.
UGC ने दिलेल्या निर्देशांनुसार सगळे निर्णय घेण्यात येत असल्याचेही उदय सामंत यांनी स्पष्ट केलं.
त्यामुळे पदवीच्या हा तीन वर्षांचा कालावधी आहे. त्यात सहा सेमीस्टर असतात. त्यातल्या सहाव्या सेमीस्टरची परीक्षा घेणार. बीकॉमचंही तसंच असणार आहे. जिथे ८ सेमीस्टर आहेत तिथे आठव्या सेमीस्टर होणार, १० सेमीस्टर असतील तिथे १० व्या सेमीस्टरची परीक्षा घेण्यात येणार असल्याचेही सामंत यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.