दिल्लीपाठोपाठ झारखंडमध्येही ऑपरेशन लोटस फेल, सोरेन यांनी जिंकला विश्वासदर्शक ठराव

4

झारखंड, ५ सप्टेंबर २०२२ : विधानसभा सभागृहात पहिल्यांदा आवाजी मतदानाने विश्वासदर्शक ठराव मंजूर करण्यात आला त्यानंतर मतांची विभागणी झाली. सरकारच्या बाजूने ४८ मते पडली तर विरोधात एकही मत पडले नाही. त्यानंतर मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे.

काही दिवसां पासून मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना आपल्या आमदारांना दुसरीकडं ‘शिफ्ट’ करावं लागलं होतं. झारखंडच्या राजकारणातील सस्पेन्स ठेवण्या साठी मुख्यमंत्री हेमंत सोरेन सरकारनं सोमवारी विधानसभेचं एका दिवसाचं विशेष अधिवेशन बोलवलं होतं. आणि आजच विश्वासदर्शक ठराव मांडणार होते. महागठबंधन आमदारांचं संख्याबळ बघता सोरेन सरकार ने हा ठराव जिंकला आहे.

विश्वासदर्शक ठरावापूर्वी सोरेन यांचं सभागृहातील भाषण!

सभागृहातील भाषणात सोरेन यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. मी प्रत्येकावर भाष्य करत बसलो तर, हे अधिवेशनही कमी पडेल असे ते म्हणाले. या राज्यातील जनता जागी झाली आहे. त्यामुळे आम्हाला धमकावून चालणार नाही. देशाचे पंतप्रधानच जर देशातील राज्यांसोबत भांडत असतील तर, देशाचा विकास कसा होणार असा सवाल उपस्थित करत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला.

न्यूज अनकट प्रतिनिधी – वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा