नवी दिल्ली, २४ सप्टेंबर २०२२ : चाइल्ड सेक्शुअल पोर्नोग्राफी प्रकरणात सीबीआयने देशभरात मोठी कारवाई केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ऑनलाईन बाल लैंगिक शोषण कंटेंट (CSEM) संदर्भात २० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ५६ ठिकाणी सीबीआयने छापे टाकले आहेत, तर या ऑपरेशनला ऑपरेशन मेघदुत नाव देण्यात आलं आहे.
सिंगापूर आणि न्युझीलँडच्या इंटरपोल युनिटने दिलेल्या माहितीनुसार CBI ने ही छापेमारी सुरू केली आहे. तर सीबीआयने, हे छापे दिल्ली मुंबई बंगलोर पटनासह २६ राज्यांमध्ये टाकले आहेत. तसेच गेल्या वर्षी चाइल्ड फोनोग्राफी प्रकरणात सीबीआयने १४ राज्या मधील ७७ ठिकाणी छापे टाकले होते. यूपीमधील जल्लोन मऊ ते नोएडा आणि गाजियाबाद पर्यंत हे छापे टाकले होते तर या ऑपरेशनला ऑपरेशन ‘कार्बन’ नाव ठेवलं होतं.
या प्रकरणात अशा अनेक टोळ्या सक्रिय आहेत, ज्या केवळ चाइल्ड सेक्शुअल पोर्नोग्राफी, संबंधित सामग्रीचा वापर करण्याबरोबरच मुलांना शारीरिक रित्या ब्लॅकमेल करून त्यांचा वापर केला, असे सीबीआयने सांगितले आहे. तसेच या टोळ्या गट तयार करून वैयक्तिकरित्या काम करत असल्याचे सांगण्यात येत आहे
चाइल्ड सेक्शुअल पोर्नोग्राफी, ही देशात नवीन गोष्ट नाही पण देशात हा चिंतेचा विषय राहिला आहे. भारतातील सोशल मीडिया साइटवर अपलोड होत असलेल्या चाइल्ड पूर्ण ग्राफी व्हिडिओ आणि कंटेंट वर सर्वोच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली आहे. १९ सप्टेंबर २०२२ रोजी सुप्रीम कोर्टाने पोर्नोग्राफी आणि बलात्कारांची व्हिडिओ अपलोड करणाऱ्यांपासून रोखण्यासाठी काय पावले उचलली आहेत या संदर्भात प्रश्न विचारला होता. तसेच या संबंधात सर्वोच्च न्यायालयाने फेसबुक ट्विटर्स सह सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म कंपन्यांना ६ आठवड्यात अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: वैभव शिरकुंडे