हाथरस बलात्कार प्रकरणातील दोन्ही अहवालात वेगवेगळी मतं

हाथरस, ५ ऑक्टोंबर २०२०: जखमी अवस्थेत हाथरस पीडित मुलीनं एका व्हिडिओमध्ये असं सांगितलं होतं की, तिच्यावर लैंगिक अत्याचार केले गेले होते, आठ दिवसांनंतर अलीगढ़च्या रुग्णालयात पीडितेच्या वैद्यकीय-कायदेशीर तपासणीत असं सांगितलं गेलं की तिच्या खाजगी भागात ‘कम्प्लीट पेनिट्रेशन’ झालं होतं, त्यात ‘गळा आवळणे’ आणि ‘तोंड बांधणे’ असा उल्लेख होता.

पण त्याच अलिगड मुस्लिम युनिव्हर्सिटी (एएमयू)च्या जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेजनं (जेएनएमसी) फॉरेन्सिक विश्लेषणाचा हवाला देत आपल्या अंतिम मतामध्ये संभोग (इंटरकोर्स) होण्याची शक्यता नाकारली.

२२ सप्टेंबरच्या मेडिको लीगल प्रकरणात (एमएलसी) अहवालात न्यायवैद्यक तपासणीत बलात्काराचे कोणतेही पुरावे सापडले नसल्याच्या यूपी पोलिसांच्या दाव्यांचा विरोध केला आहे. उत्तर प्रदेशचे एडीजी (कायदा व सुव्यवस्था) प्रशांत कुमार यांनी सांगितलं होतं की, पीडित मुलीच्या नमुन्यांवर कोणतेही शुक्राणू / वीर्य आढळू आले नाही.

जेएनएमसीच्या फॉरेन्सिक मेडिसिन विभागानं केलेल्या एमएलसीच्या नुसार हल्ल्याच्या वेळी पीडित मुलगी बेशुद्ध झाली होती.

नंतर असं निदर्शनात आलं की, पीडितेचा ओढणीनं गळा आवळला गेला होता. पीडितेच्या विधानाच्या आधारे चार संशयितांची नावं देण्यात आली आहेत. एमएलसीच्या अहवालानुसार तिचं तोंड दाबून तिला शांत करण्यात आलं होतं. यादरम्यान जीवे मारण्याच्या हेतूनं करण्यात आलेल्या हल्ल्याला देखील तिला सामोरे जावं लागलं होतं.

निष्कर्षांशी संबंधित अंदाजांमध्ये, पीडित मुलीचा गळा दाबल्यामुळं घशातील लिगचर मार्क्स उजवीकडं १०x३ सेमी आणि डाव्या बाजूला ५x२ सेमी होते. परंतु योनिमार्गाचे क्षेत्र दर्शविणार्‍या डायग्राम मध्ये कोणतीही जखम झाल्याची नोंद नाही.

कम्पलीट पेनिट्रेशन

तथापि, एमएलसी’नं नोंद केली आहे की पीडितेला ‘कम्पलीट पेनिट्रेशन’ चा सामना करावा लागला होता.

जेएनएमसी’च्या फॉरेन्सिक मेडिसिन विभागातील सहाय्यक प्राध्यापक डॉ. फैज अहमद यांच्या वतीने स्वाक्षरीकृत, अहवालात एका विभागात “माहित नाही” असं लिहिलं आहे. या विभागात या विषयी माहिती सूचित केली होती की, पीडितेच्या कपड्यांवर किंवा शरीराच्या आत वीर्याचे नमुने सापडले आहेत की नाहीत.

२२ सप्टेंबर रोजी दुपारी १.३० वाजता तपासणी अहवाल पूर्ण झाला. पीडित मुलीवर १४ सप्टेंबर रोजी हल्ला करण्यात आला होता. तपासणी करणार्‍या डॉक्टरांच्या भूमिकेनुसार पीडितेला जबरदस्ती केली गेली. तथापि, त्यांनी असंही सांगितलं की, याविषयी सविस्तर माहिती तेव्हाच मिळू शकते जेव्हा यावर सविस्तर विश्लेषण आणि सक्षम फॉरेन्सिक सायन्स लॅब मध्ये याची तपासणी केली जाईल.

अंतिम मत वेगळे

परंतु १० ऑक्टोबरला हाथरस जिल्ह्यातील सदाबाद पोलिस स्टेशनला लिहिलेल्या पत्रात जेएनएमसी’नं नमुन्यांची संपूर्ण न्यायिक तपासणी उद्धृत केली आणि पीडित मुलीवर लैंगिक अत्याचार झाले नाही असा निष्कर्ष काढला. असं म्हटलं आहे की, ‘योनिमार्गासंबंधी किंवा गुदद्वारासंबंधित इंटरकोर्स होण्याची कोणतीही चिन्हं नाहीत.’

बलात्काराच्या आरोपाबाबत वेगवेगळी मतं

यापूर्वी भाजपाच्या आयटी सेल’नं पीडित मुलीची आणि तिच्या आईच्या व्हिडिओचा हवाला देऊन या प्रकरणातील बलात्काराच्या आरोपाला कमी केलं आहे.

पीडितेनं एका व्हिडिओमध्ये दिलेले निवेदन आणि या संबंधित इतर दोन व्हिडिओ बारकाईने पाहिले असता तिनं आपल्या सोबत जबरदस्ती झाल्याचं तसेच आरोपींची नावं देखील सांगितले असल्याचा स्पष्ट उल्लेख समोर येतो.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा