इंदापूर, दि. २१ जून २०२० : इंदापूर तालुक्यातील गावा गावातील नागरिक माझ्या कुटुंबातील नागरिक आहेत. याच भावनेतून तमाम जनतेसाठी रात्रंदिवस मेहनत घेतो आहे. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांची कोरोना सारख्या संसर्गजन्य परिस्थितीत तालुक्यातील विरोधकांना कोणताही मदतीचा हात नागरीकरणात येता येत नाही. सामाजिक कोणतीही जाणीव नाही. त्यामुळे तुम्हाला जनतेने फक्त विश्रांती घेण्यासाठी ठेवले आहे. असा टोला हर्षवर्धन पाटील यांचे नाव न घेता सार्वजनिक बांधकाम, वन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी लगावला.
इंदापूर तालुक्यातील मौजे गोखळी परिसरामध्ये वनविभागाच्या अधिकारी यांनी अतिक्रमण काढण्यासाठी केलेल्या कारवाईत नुकसान झालेल्या ग्रामस्थांच्या समवेत राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी या ठिकाणी पायी चालत जाऊन पाहणी केली. गावातील भैरवनाथ मंदिरात सुट्टीच्या दिवशीही वनविभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांना तातडीने बोलावून ग्रामस्थ, गावचे प्रमुख पदाधिकारी यांची संयुक्त बैठक घेऊन उपस्थित कागदपत्रे पाहत बाधीत ग्रामस्थांची मते राज्य मंत्री दत्तात्रय भरणे यांनी जाणून घेतली यावेळी भरणे बोलत होते.
यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गोखळी परिसरातील नागरिकांना मास्कचे मोफत वाटप करण्यात आले. महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष डॉ. शशिकांत तरंगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे इंदापूर तालुका कार्याध्यक्ष अतुल झगडे, गोखळी गावचे सरपंच बापूराव पोळ, जि. प. सदस्य अभिजित तांबिले, सचिन तरंगे, हरणावळे गुरूजी, सचिन वाघमोडे यांच्यासह गोखळी परिसरातील ग्रामस्थ, युवक तसेच महिला या संख्येने उपस्थित होत्या.
यावेळी बोलताना राज्यमंत्री भरणे म्हणाले की, यापुढील काळात आपण स्वतः लक्ष घालून ग्रामस्थ, वनविभागाचे अधिकारी यांची सर्वांची एकत्रित बैठक घेतली जाईल. सर्वानूमते निर्णय घेतला जाणार असून, माझ्या सर्वसामान्य जनतेचे नुकसान होणार नाही. याची पूर्णपणे दक्षता घेतली जाणार असून सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी सत्तेत असो किंवा नसो सदैव पाठीशी खंबीरपणे उभा रहाणार असल्याची ग्वाही राज्यमंत्री भरणे यांनी दिली.
न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल कणसे