Ind Vs SA, 15 मे 2022: इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 च्या समाप्तीनंतर, भारताला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाच सामन्यांची T20 मालिका खेळायची आहे. या मालिकेसाठी लवकरच टीम इंडियाची घोषणा केली जाणार असून यामध्ये अनेक वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे. या मालिकेत कर्णधार रोहित शर्मा, उपकर्णधार केएल राहुल, विराट कोहली यांना विश्रांती देण्यात आली आहे.
अशा परिस्थितीत संघाची धुरा कोण घेणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, शिखर धवन किंवा हार्दिक पांड्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या T20I मालिकेत भारताचे नेतृत्व करू शकतात.
का दिली जात आहे विश्रांती?
रिपोर्टनुसार, या मालिकेत रोहित शर्माशिवाय केएल राहुल, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि ऋषभ पंत यांना विश्रांती दिली जाऊ शकते. हे खेळाडू सतत क्रिकेट खेळत आहे आणि यानंतर भारताला इंग्लंडचा महत्त्वाचा दौरा करायचा आहे. त्यामुळे खेळाडूंनाही विश्रांती देणे गरजेचे आहे.
22 मे रोजी टी-20 मालिकेसाठी संघ निवडला जाऊ शकतो, या दिवशी आयपीएलचे लीग सामने संपत आहेत. अशा परिस्थितीत कर्णधार रोहित शर्माही मोकळा असेल, येथे निवडकर्ते संघ निवडतील.
बीसीसीआयच्या एका सूत्राने पीटीआयला सांगितले की, सर्व वरिष्ठ खेळाडूंना तीन-चार आठवड्यांची विश्रांती दिली जाईल जेणेकरून ते थेट इंग्लंड दौऱ्यात सहभागी होऊ शकतील. रोहित, विराट, केएल, ऋषभ, बुमराह थेट इंग्लंडमध्येच संघात सामील होतील. कर्णधारपदाचा विचार करता निवडकर्त्यांसमोर दोन मोठे पर्याय आहेत, शिखर धवन जो भूतकाळात कर्णधार होता आणि हार्दिक पंड्या ज्याने गुजरात टायटन्ससाठी आपल्या कर्णधारपदाने सर्वांना प्रभावित केले होते.
तर मोहसीन खानचा या मालिकेसाठी टीम इंडियामध्ये समावेश केला जाऊ शकतो. निवड समितीच्या नजरा उमरान मलिकवर आहेत, पण आता उमरान मलिकला आणखी काही वेळ दिला जाऊ शकतो.
असा असू शकतो संघ – ऋतुराज गायकवाड, इशान किशन, श्रेयस अय्यर, दीपक हुडा, शिखर धवन, हार्दिक पांड्या, संजू सॅमसन, भुवनेश्वर कुमार, प्रसिद्ध कृष्णा, हर्षल पटेल, आवेश खान, रविचंद्रन अश्विन, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव
भारत-दक्षिण आफ्रिका T20 मालिका
9 जून – 1ली T20
12 जून – दुसरी T20
14 जून – तिसरी T20
17 जून – चौथी T20
19 जून – पाचवी T20
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे