मुंबई, २८ जुलै २०२०: सामनाच्या मुलाखती दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षाला सरकार पाडण्याचे आव्हान केले होते. तर त्याला उत्तर राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिले आहे.
विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीसांची सडकून टिका……
विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “आम्हाला तुमचे सरकार पाडण्यात काही रस नाही”, तुमच्या आतील वादामुळेच ते कोसळेल असा हल्ला चढवला. एकमेकांच्या तंगड्या तोडायला तुम्ही स्वत: सज्ज आहात आणि ते तुम्ही रोज करता असे देखील ते म्हणाले. तर तुम्ही सरकार आधी व्यवस्थित चालून दाखवा असे आव्हान देखील त्यांनी मुख्यमंत्र्यांना केले आहे. त्याबरोबरच ते पुढे म्हणाले की, मुख्यमंत्र्याच्या तीन चाकी सरकारचे स्टेअरिंग त्यांच्याच हातात आहे त्या स्टअेरिंगवर मुख्यमंत्र्यांचाच हातात आहे पण, जायचे कुठे याचा निर्णय मात्र मागे बसलेले घेत असतात. अशी सडकून टिका देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्या बरोबरच हे सरकार पडेपर्यंत आम्ही वाट बघायची भूमिका घेऊ आणि नंतर महाराष्ट्राचे काय भवितव्य ठरवायचे हे ठरवू , असे ते पुढे म्हणाले.
विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणीस ट्रोल….
देवेंद्र फडणवीस हे नेहमीच नेटक-यांच्या ट्रोलचा शिकार होत असतात. तर त्यांना “टरबुज्या” म्हणुन इतके ट्रोल करण्यात आले कि त्यांनी वैतगून त्यांच्या विरोधात सरकारचे हे षडयंत्र असल्याचा आरोप देखील केला होता तर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा फक्त उद्धव ठाकरे असा उल्लेख केल्यामुळे शिवसेनेचे समर्थक हे त्यांच्यावर नाराज असून “मुख्यमंत्री बोलायला लाज वाटते का तुला” अशा प्रखर शब्दात नेटकरी त्यांना धारेवर धरत ट्रोल करत आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी