केडीएमसील होणाऱ्या रूग्णांच्या लूटेवर विरोधी पक्षाचा निशाणा …

डोंबिवलीत, १७ ऑगस्ट २०२०: कल्याण-डोंबिवलीत कोरोनाची प्रादुर्भाव हा दिवसेंदिवस वाढत जात आहे ,वेगवेगळे प्रयोग करून सुद्धा जैसे थी परिस्थिती पाहायला मिळत आहे . त्यामुळे रुग्णांच्या संख्येत सुद्धा कोणत्याच प्रकारची घट पाहायला मिळत नाही त्यामुळे दररोज २०० ते ३५० च्या आकड्यात रूग्णसंख्या वाढत आहे. एवढंच नव्हेतर काही दिवसांपूर्वी कल्याण-डोंबिवलीत कोरोना रुग्णांकडून अवाजवी बिल वाढ करणाऱ्या रुग्णालयांना सुध्दा नोटीसा पाठवून कारवाई केली आहे, असे कल्याण डोंबिवलीत महानगरपालिका कडून सांगितले गेले.

कल्याण-डोंबिवलीत करोना संकट काळात महापालिका प्रशासन लोकांना सेवा-सुविधा देण्याऐवजी ठेकेदारांची काळजी घेण्यात व्यस्त आहे, असे आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे . कोरोना रुग्णालयात रूग्णांची होणारी लूट , अवाजवी बिलवाढ यावर प्रवीण दरेकर यांनी टिका केली . प्रसाशनाच्या भोंगळ्या कारभारावर सुद्धा त्यांनी बोचक टिका केली . राजकारण आणि लोकांचा जीव यात फरक राजकारण्यांनी ओळखावा असे वक्तव्य यावेळी त्यांनी केले.

रूग्णांकडून खाजगी रुग्णालयांत मोठ्या प्रमाणात लूट होत आहे त्यामुळे कल्याण-डोंबिवलीत नागरिकांचा विचार करून कारभार करावा, पैसे उकळण्याचा धंदा बंद करा. नागरिकांनाच्या हिताच्या कामावर नेत्यांनी आणि महानगरपालिकेने भर टाकावा असे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनी वक्तव्य केल.

न्यूज अनकट प्रतिनिधी: राजश्री वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा