मुंबई, ११ सप्टेंबर २०२२ : महाराष्ट्रात मागील दोन महिन्यापासून पावसाने थैमान घातले आहे. परंतु मध्यंतरी काही दिवस पावसाने उघडी घेतल्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. वातावरणात होणारे या बदलामुळे पावसाच्या भीतीमुळे नागरिकांचे जनजीवन काही प्रमाणात विस्कळीत झाले होते. परंतु या महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच पावसाने महाराष्ट्रभर चांगला जोर धरलेला आहे. त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीतही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. हवामानात होणाऱ्या या वातावरणीय बदलानुसार परतीच्या पावसाचे काही दिवस लांबणीवर पडल्याचे चित्र दिसत आहे.
मोसमी पावसाचा परतीचा प्रवास लांबणीवर पडला असून, पुढील चार दिवस कोकण किनारपट्टी लगत असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याकडून यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे मुंबई आणि पुणे परिसरात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
मागील दोन दिवसापासून होत असलेल्या पावसामुळे महाराष्ट्राच्या विविध राज्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. गणेश विसर्जना दिवशी पावसाने हजेरी लावल्यामुळे, भाविकांच्या मध्ये चैतन्याचे वातावरण झाले होते. तर काही ठिकाणी नागरिकांची तारांबळ उडाली होती. ग्रामीण भागात बळीराजांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले होते. विसर्जन मिरवणुकी वेळी पावसाचा जोर वाढल्यामुळे भाविकांची त्रिधात्रीपट उडालेली पहावयास मिळाली. यामुळे विसर्जन मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाल्याचे पहावयास मिळाले. दरम्यान पुढील दोन दिवस हवामान विभागा कडून रत्नागिरी जिल्ह्यासह कोकण किनारपट्टी भागात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर