पुण्यात संत्रा महोत्सव! ग्राहकांना मिळणार ताज्या संत्र्यांची चव

23

पुणे १८ फेब्रुवारी २०२५ : संत्र्याच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या वतीने गांधी भवन, कोथरूड येथे २० ते २६ फेब्रुवारी दरम्यान संत्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात ग्राहकांना थेट उत्पादकांकडून ताज्या, दर्जेदार संत्र्यांची खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.

‘उत्पादक ते ग्राहक थेट विक्री’ या संकल्पनेवर आधारित या महोत्सवात नागपूर, अमरावती आणि विदर्भातील शेतकरी आपली उत्पादने थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवणार आहेत. त्यामुळे संत्रा प्रेमींना बाजारभावापेक्षा उत्तम दरात आणि दर्जेदार माल मिळणार आहे.

मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम यांनी माहिती देताना सांगितले की, “या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना योग्य दर मिळेल आणि ग्राहकांनाही ताजे, चविष्ट संत्रे मिळतील. पुणेकरांनी या संधीचा लाभ घ्यावा!” तर मग, पुणेकरांनो, संत्र्याची चव चाखायला तयार आहात ना?

न्युज अनकट प्रतिनिधी – सोनाली तांबे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा