ऑर्किड ग्रुप ऑफ इन्स्टिट्युशन, बजाजनगरच्या विद्यार्थ्यांनी सप्टेंबर २०२५ मधील CA FOUNDATION परीक्षेत नेत्रदीपक कामगिरी केली. रितेश कृष्णा धोत्रे (२७८ गुण ), अजित जनार्धन निकम (२४२ गुण ) आणि चैतन्य नरेंद्र गुरव (२४० गुण ) यांनी उच्च गुण मिळवत मराठवाड्यात मानाचा मुजरा केला आहे.
या तिघांच्या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन, मुख्याध्यापिका, शिक्षकवृंद, कर्मचारी व पालकांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
न्यूज अनकट प्रतिनिधी: गजानन राऊत













































