नवी दिल्ली, १७ सप्टेंबर २०२०: माजी केंद्रीय मंत्री अरुण शौरी यांच्याविरूद्ध एफआयआर’चे आदेश देण्यात आले आहेत. अरुण शौरीविरूद्ध भ्रष्टाचार आणि फसवणूकीच्या प्रकरणात एफआयआर नोंदविण्याचे विशेष सीबीआय कोर्टाचे न्यायाधीश पी. के. शर्मा यांनी आदेश दिलेत.
वास्तविक शौरीवर, चालवल्या जाणाऱ्या सरकारी हॉटेलच्या विक्रीतील भ्रष्टाचाराचं प्रकरण उघडकीस आलं होतं, त्यानंतर त्याच्याविरुद्ध एफआयआर नोंदवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हे प्रकरण राजस्थानमधील उदयपुरातील लक्ष्मी विलास पॅलेस हॉटेलशी संबंधित आहे. अरुण शौरी यांच्यावर २५२ कोटी रुपयांच्या हॉटेलचा साडेसात कोटी रुपयांना निर्गुंतवणुकीचा आरोप आहे. त्याचबरोबर उदयपूर जिल्हाधिकार्यांना तत्काळ हॉटेल ताब्यात घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
कोण आहते अरुण शौरी?
माजी राज्यमंत्री खासदार अरुण शौरी हे १९९९-२००४ दरम्यान माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वात तत्कालीन सरकारमधील केंद्रीय संचार, माहिती तंत्रज्ञान आणि निर्गुंतवणूक मंत्री होते. रॅमन मॅग्सेसे पुरस्कारानं सन्मानित शौरी यांनी १९६७ ते १९७८ दरम्यान जागतिक बँकेमध्ये अर्थशास्त्रज्ञ म्हणूनही काम केलं आहे. अरुण शौरी हे ‘द इंडियन एक्सप्रेस’ चे संपादकही राहिले आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे