चंद्रपुरात झालेल्या भात शेतीच्या नुकसानी बाबतचे पंचनामे करण्याचे आदेश

29

चंद्रपुर, १३ ऑक्टोंबर २०२०: मागच्या वर्षीप्रमाणेच यंदाही पावसानं सरासरीपेक्षा जास्त हजेरी लावली आहे. यंदाचा पावसाळा देखील लांबला आहे त्यात आता परतीचा पाऊस सुरू असल्यामुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे. मागच्या महिन्यात देखील पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं होतं. विशेष करून सिंधुदुर्गमध्ये पावसामुळं भातशेतीचे बरेच नुकसान झाले आहे. याच पार्श्वभूमीवर पालकमंत्री उदय सामंतांनी सिंधुदुर्ग येथे अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली.

ओला दुष्काळ जाहीर करावा अशी सातत्यानं शेतकऱ्यांकडून मागणी करण्यात येत आहे याबाबत लवकरच निर्णय घेऊ असं त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर पावसामुळं झालेल्या शेतीच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले. राज्य शासनंने शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या यादीची मागणी केल्यानंतर तातडीनं ती सादर करता यावी यासाठी नुकसानीचा सर्वे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.

दिवाळीपूर्वी हलक्या धानाची कापणी होत शेतकऱ्यांना काही पैसा हाताशी येत असल्यानं हा काळ शेतकऱ्याच्या दृष्टीनं महत्त्वाचा असतो. मात्र, जिल्ह्यातील सर्वच भागात ऐन काढणीला आलेल्या धान पिकांमध्ये दोन ते तीन फूट पाणी साचल्यानं संपूर्ण धान सडून गेले आहे. हातातोंडाशी आलेला धानशेतीचा घास निसर्गानं हिरावला असून यामुळं शेतकरी संकटात सापडला आहे. गेली काही वर्षे हे चित्र सातत्याने दिसत असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून भरपाईची मागणी पुढे येत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा