अवयवदानातून मिळाले तीन रुग्णांना जीवदान

Human organ for transplantation design flat.Vector illustration

मुंबई : खारघर येथील १६ वर्षांच्या महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा रस्त्यावर अपघात झाला. अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर ब्रेनडेड घोषित करण्यात आले. या मुलाच्या आई-वडिलांनी त्याचे अवयव दान करून दुसऱ्यांचा जीव वाचवण्यासाठी पुढाकार घेतला. या अवयवदानातून तीन जणांना जीवदान मिळाले. उपचाराच्या दरम्यान त्याचा मेंदू मृत झाला.
या मुलाचं नाव जेफरीन जॉसी असं आहे. सोमवारी तो रस्ते अपघातात गंभीर जखमी झाला. त्याच्या डोक्याला दुखापत झाली. त्याला तात्काळ उपचारांसाठी नेरुळच्या खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

मात्र उपचाराच्या दरम्यान त्याचा मेंदू मृत झाला असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. कुटुंबियांनी घेतला अवयवदानाचा निर्णय
मुंबई विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय केंद्राच्या (झेडटीसीसी) समन्वयकांनी जेफरीनच्या पालकांचे आणि कुटुंबातील सदस्यांचे समुपदेशन केले आणि अवयवदानाचा निर्णय घेतला. त्यानंतर पाटील हॉस्पिटलमधील प्रत्यारोपण शल्य चिकित्सक डॉ. कैलास जावडे, डॉ. ताहेर शेख आणि झेडटीसीसीने नियुक्त केलेल्या डॉक्टरांच्या टीमने ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली.
याबाबत त्याची आई म्हणाली की, माझ्या मुलाप्रमाणे जगात इतरही गरजू मुले आहेत. त्यामुळे मी फक्त मास्टर जेफरीनचीच आई नाही. त्यामुळे मुलांची काळजी घेण्यासाठीच देवाने आईची निर्मिती केली. जेफरीनचे अवयवदान इतर कोणाला तरी जीवनदान देणारे ठरणार, असल्याची प्रतिक्रिया जेफरीनची आई एलिझाबेथ जोसेफ यांनी दिली.
दोन मूत्रपिंडे आणि यकृत दान करण्यात आले. पालकांच्या सांगण्यावरून मास्टर जेफरीन जॉसी याची दोन मूत्रपिंडे आणि यकृत दान करण्यात आले आहे. त्यामुळे तिघांना जीवनदान मिळाले. नेरुळच्या डी.वाय.पाटील या हॉस्पिटलला किडनी तसेच यकृत प्रत्यारोपणासाठी परवाना मिळाल्यानंतर प्रथम अवयवदान प्रत्यारोपण करण्यात आले.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा