बिलोली येथे विविध आजारांवरील मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन, वैद्यकीय अधीक्षक डॉ. नागेश लखमावार यांची माहिती

पुणे, दिनांक २८ सप्टेंबर २०२२ : नांदेड जिल्ह्यातील बिलोली येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राष्ट्रीय अभियान (NHM) आणि माता सुरक्षित घर सुरक्षित या अभियाना अंतर्गत मोफत महाआरोग्य दंत चिकित्सा व शूल्यचिकिसा (आॕपरेशन) शिबिराचे आयोजन २९ सप्टेंबर रोजी बिलोली उपजिल्हा रूग्णालय येथे करण्यात आले आहे. या शिबिराचा बिलोली, नायगाव, धर्माबाद, देगलुरसह परिसरातील रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन बिलोली उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डाॕ.नागेश लखमावार यांनी केले.

सलग चार दिवस होणाऱ्या या शिबिरात डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व गुरुगोविंदसिंगजी रुग्णालय नांदेड व आरोग्य सेवेतील तज्ञ डॉक्टरांकडून रुग्णांची तपासणी व उपचार केले जाणार आहेत. यामध्ये रूग्णांचा रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार तपासणी व उपचार करण्यात येतील. शल्यचिकित्सक पात्र रुग्णांची तपासणी करून रक्तदाबहायड्रोसिल (अंडावृद्धि) हॉर्नीया, अपेंडिक्स, गर्भाच्या कॅन्सरचे निदान व पुढील उपचार त्याचबरोबर सर्व प्रकारच्या शरीरावरील गाठीच्या शस्त्रक्रिया, शालेय मुलांच्या नियोजित शस्त्रक्रिया करण्यात येतील. या शस्त्रक्रिया सुसज्ज शस्त्रक्रिया व भुल तज्ञांच्या देखरेखीखाली होणार आहेत.

शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांची मोफत जेवणाची सोय करण्यात येणार आहे. शस्त्रक्रियेनंतर तज्ञ डॉक्टरकडून पुनर्तपासणी व औषधोउपचार करण्यात येतील. २९ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीमध्ये बिलोली उपजिल्हा रूग्णालयाच्या रुग्णालयांतर्गत कार्यक्षेत्रात राबविण्यात येत असलेल्या शिबिराचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन बिलोली उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डाॕ. नागेश लखमावार यांनी केले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा