संगीत शाकुंतल नाटकास १४० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल ‘ नांदी सुवर्णकाळाची’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन

पुणे, २ नोव्हेंबर २०२०: अण्णासाहेब किर्लोस्कर यांच्या ‘संगीत शाकुंतल’ या नाटकाच्या पहिल्या प्रयोगाला १४० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल ‘संवाद पुणे’ आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट यांच्या वतीने ‘नांदी सुवर्णकाळाची’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

किर्लोस्कर रंगमंदिर म्हणजे आताच्या वसंत टाॅकीजमध्ये ज्येष्ठ रंगकर्मी श्री. सतीशजी आळेकर यांच्या हस्ते तिसरी घंटा वाजवण्यात आली आणि नाट्यकलेचा जागर झाला. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ यांचा हस्ते ‘नटराज’ पूजन करण्यात आले.

याप्रसंगी वसंत टाॅकीजचे श्री विलास टापरे, श्री मोहन टापरे, ट्रस्टचे उपाध्यक्ष श्री सुनील रासने कोशाध्यक्ष श्री महेश सूर्यवंशी, संवाद पुणेचे श्री सुनील महाजन, श्री महेश सूर्यवंशी, चारुदत्त आफळे, मधुवंती दांडेकर, निकीता मोघे उपस्थित होते.

यावेळी प्रसिद्ध गायक आनंद भाटे, तबलावादक भरत कामत, ऑर्गनवादक राहुल गोळे यांनी ‘संगीत शाकुंतल’मधील नांदी सादर केल्या.

न्यूज अनकट प्रतिनिधी : ज्ञानेश्वरी आयवळे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा