गोल पोस्ट स्पॉटलाइट सिनेमा “ऑस्कर”च्या यादीतून ‘गली बॉय’ बाहेर

“ऑस्कर”च्या यादीतून ‘गली बॉय’ बाहेर

मुंबई: रणवीर सिंग आणि आलिया भट यांची प्रमुख भूमिका असलेला “गली बॉय” या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले होते. याशिवाय या चित्रपटाने “ऑस्कर” च्या यादीतही धडक मारली होती. त्यामुळे भारताच्या या चित्रपटाबाबत खूप आशा वाढल्या होत्या.परंतु आज “गली बॉय” हा चित्रपट ऑस्करच्या यादीतून बाहेर पडला आहे. त्यामुळे भारतीय चित्रपट ऑस्कर पुरस्कारापासून लांब राहिला आहे.

याबाबत “अकॅडमी ऑफ मोशन पिचर आर्ट अँड सायन्स” यांनी सोमवारी (दि.१६) रोजी जाहीर केलेल्या यादीमध्ये ‘गली बॉय’ला स्थान मिळालेले नाही.त्यामुळे चाहत्यांमध्ये पुन्हा एकदा नाराजी पसरली आहे. या यादीमध्ये ‘द पेटंट बर्ड’,’ टुथ अँड जस्टीस’, लेस मिसरेबल्स, दोज हु रिमेन्स, हानीलँड, कॉपर्स क्रिस्टी, बिनपोल, अटलांटिक्स, पारासाइट आणि पेन अँड ग्लोरी या चित्रपटांचा यात समावेश आहे.

मुंबई येथे गल्ली बोळात राहणाऱ्या तरुणाईच्या मनातील स्वप्नांना भरारी देत , त्याच स्वप्नांचा आधार घेत यश शिखरापर्यंत पोहचवणारी वास्तववादी कथा झोया अख्तर यांनी या चित्रपटातून दाखवण्यात आली आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version