गोल पोस्ट इतर सरकारी योजना नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधातील आंदोलनाचे लोण पोहचले पुण्यात

नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधातील आंदोलनाचे लोण पोहचले पुण्यात

पुणे : नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनांचे लोण पुण्यापर्यंत येऊन पोहोचले आहे.
दिल्लीतील जामिया मिलिया विद्यापीठात विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलीस कारवाईच्या निषेधार्थ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी निषेध सभा आयोजित करुन आंदोलन केले.
युवक काँग्रेस, एनएसयुआय, युक्रांद, भारती विद्यार्थी मोर्चा या संघटना सहभागी झाल्या होत्या. या आंदोलन जामिया विद्यापिठातले माजी विद्यार्थीही सहभागी झाले. यावेळी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता.

यावेळी मोदी आणि शाह यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. ‘युद्ध नको, बुद्ध हवा’ असे फलकही झळकवण्यात आले. नागरिकत्व सुधारणा कायदा रद्द करावा, अशी मागणी करण्यात आली.

error: Content is protected !!
Exit mobile version