Oscars 2022: भारताचा डॉक्युमेंटरी ‘रायटिंग विथ फायर’ ऑस्करसाठी नामांकित, पहा यादी

नवी दिल्ली, 9 फेब्रुवारी 2022: दरवर्षी चित्रपट जगताशी संबंधित लोक ऑस्कर पुरस्कारांच्या नामांकनाची वाट पाहत असतात. ऑस्कर 2022 साठी नामांकनांची यादी समोर आली असून यावेळी भारतातील एका डॉक्युमेंटरी चित्रपटाला ऑस्करमध्ये प्रवेश मिळालाय. ऑस्करच्या अंतिम यादीत भारताच्या रायटिंग विथ फायर या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट माहितीपट फीचरच्या श्रेणीत नामांकन मिळालंय. ही संपूर्ण देशासाठी अभिमानाची बाब आहे. तसेच, चित्रपटाच्या कलाकार आणि क्रूसाठी यापेक्षा चांगलं काय असू शकतं.

पत्रकारितेवर आधारित माहितीपट

फायर विथ फायर हे निर्दोष पत्रकारितेवर आधारित आहे आणि यापूर्वीच सनडान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये विशेष ज्युरी पुरस्कार जिंकला आहे. या चित्रपटाला आतापर्यंत 20 हून अधिक आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले असून सर्वत्र त्याचं कौतुक होत आहे. आता या सिनेमाकडून लोकांना मोठ्या अपेक्षा आहेत. यावेळी हा चित्रपट भारतासाठी नक्कीच ऑस्कर घेऊन येईल, असा विश्वास आहे.

या चित्रपटासह ज्या चित्रपटांना नामांकन मिळालं आहे ते असेंशन, अटिका आणि फ्ली आणि समर ऑफ द सोल सारखे चित्रपट आहेत. हा चित्रपट रिंटू थॉमस आणि सुष्मित घोष यांनी संयुक्तपणे दिग्दर्शित केला होता. दोघांच्याही कारकिर्दीतील हा पहिलाच डॉक्युमेंटरी चित्रपट आहे. महिला पत्रकाराला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावं लागतं यावर हा चित्रपट आहे. देशभरातील लोकांच्या आशा या चित्रपटाशी जोडल्या गेल्या आहेत.

चित्रपटाचे सह-दिग्दर्शक सुष्मित घोष यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत चित्रपटाबद्दल बोलताना सांगितलं की- ‘चित्रपट निर्माता म्हणून मी आणि रिंटूने नेहमीच वास्तव आणि अपेक्षांवर आधारित चित्रपटांवर काम केलं आहे. रायटिंग विथ फायरचा प्रवास यंदा छान होता. माझ्या चित्रपटाचं देशातच नव्हे तर जगभरात कौतुक होत आहे हे पाहून मला खूप समाधान मिळतं. आता हा चित्रपट ऑस्कर जिंकू शकतो की नाही हे पाहायचं आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा