ऑस्कर पुरस्कार हा दरवर्षी जगभरातल्या सर्वोत्तम चित्रपटांशी संबंधित घटकांचा हा पुरस्कार देऊन गौरव केला जातो. यंदाच्या २०२३ च्या नामांकनांचे निकाल जाहीर करण्यात आले आहे. तर ऑस्कर पुरस्कार बद्दल आज आपण माहिती जाणून घेऊयात.
ऑस्कर हा पुरस्कार चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल अमेरिकेत दिला जाणारा पुरस्कार. ऑस्कर पुरस्कार हा अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्स तर्फे दिला जातो. प्रथम पुरस्कार सोहळा हा १९२९ मध्ये पार पडला होता. पहिल्या सोहळ्यात १५ ऑस्कर पुरस्कार दिले गेले होते. इ.स. १९५३ मध्ये ऑस्कर सोहळा प्रथमच टीव्हीच्या माध्यमातून अमेरिकेची संयुक्त संस्थाने आणि कॅनडा पर्यंत दाखवला गेला. इ.स. १९६९ पासून ऑस्कर सोहळा जगभर प्रक्षेपित केला जाऊ लागला. सध्या हा सोहळा २०० पेक्षा अधिक देशात पाहता येतो. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचे पहिले ऑस्कर एमिल जॅनिंग्ज यांना, तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे पहिले ऑस्कर जेनेट गेनर यांना मिळाले दिले गेले होते. भारता कडून सर्वात पहिला ऑस्कर पुरस्कार मिळवला तो वेशभूषाकार भानू अथैय्या यांनी. अथैय्या यांना १९८२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गांधी’ या सिनेमातील वेशभूषेसाठी हा पुरस्कार मिळाला होता. हा सिनेमा महात्मा गांधी यांच्या जीवनावर आधारीत होता. भारतामध्ये फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया ही संस्था ऑस्कर च्या नॉमिनेशन साठी भारतातल्या चित्रपटांची निवड करते.
आपल्याला सगळयांना एक नेहमी प्रश्न असतो कि ऑस्कर च्या ट्रॉफी वरती असणारी ती मूर्ती नक्की आहे तरि कोणाची तर ती मूर्ती ही कोण्या व्यक्तीची. नसून ती एक प्रतिमा तयार करण्यात आलेली होती. या मूर्ती मध्ये एक व्यक्ती कॅमेराच्या रोल वर उभा असलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याच्या हाती एक तलवार असल्याचे आपल्याला दिसते. मूर्ती आधी हि तांब्याच्या धातूची होती पण ती आता ब्रिटेनियम धातू ची आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: आचल सूर्यवंशी