नवी दिल्ली(वृत्तसंस्था) : सिनेसृष्टीतील सर्वाधिक प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या ऑस्कर चित्रपट पुरस्करांची नामांकने जाहीर झाली आहेत.
भारतीय वेळेनुसार येत्या १० फेब्रुवारी रोजी डॉब्ली थिएटरमध्ये हा ऑस्कर सोहळा रंगणार आहे.
यंदाच्या ऑस्कर नामांकनामध्ये ‘जोकर’ या चित्रपटाने बाजी मारली आहे. ऑक्टोंबर महिन्यात प्रदर्शित झालेला ‘जोकर’ २०१९ मधील सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून चर्चेत होता.
सर्वोत्तम सिनेमा, सर्वोत्तम दिग्दर्शन, सर्वोत्तम अभिनेता, ओरिजनल स्कोर, संकलन, सिनेमॅटोग्राफी, पटकथा अशा सात विभागांमधील नामांकनांमध्ये ‘जोकर’ ने बाजी मारली आहे.
भारताचा ‘गली बॉय’ या स्पर्धेतून बाहेर पडला असला तरी भारताकडून ‘द लास्ट कलर’ हा सिनेमा ऑस्करसाठी पाठवण्यात आला आहे.