उस्मानाबाद, दि. २४ जून २०२० : भारतीय जनता पार्टीचे नेते गोपीचंद पडळकर यांनी धनगर समाजाच्या आरक्षणावरून ठाकरे सरकार तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वर टिका केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहेत अशा प्रकारचे विधान बोलून ते राज्यात निर्माण झालेल्या मोठ्या वादाचे कारण बनले हेत. शरद पवार हे कित्येक वर्षांपासून महाराष्ट्राचे नेतृत्व करत आहेत, या काळात राज्यातील बहुजनांवर अत्याचार करण्याची त्यांची भूमिका कायम राहिली आहे, अशा प्रकारचे वक्तव्य पडळकर यांनी केले.
गोपीचंद पडळकर यांच्या या विधानामुळे राज्यातील नागरिकांकडून पडळकर विरूद्ध संताप व्यक्त केला जात आहे. उस्मानाबाद जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून पडळकर यांचा निषेध करण्यात आला तसेच उस्मानाबाद मध्ये पडळकर यांच्या प्रतिमेचे दहन करण्यात आले. यासोबतच उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब मध्ये पडळकर यांच्या प्रतिमेला जोडे मारून संताप व्यक्त करण्यात आला.
न्यूजअनकट प्रतिनिधी: प्रगती कराड