नवी दिल्ली, ३० ऑगस्ट २०२३ : राजधानी दिल्लीत होवू घातलेल्या जी-२० शिखर संमेलनाच्या पूर्वी दिल्ली पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव १२ सप्टेंबर पर्यंत पॅराग्लायडर्स, हॅंग-ग्यालडर्स तसेच गरम हवेवर उडणाऱ्या फुग्यांच्या उड्डाणांवर बंदी घातली आहे. देशाचे शत्रू असलेले गुन्हेगारी प्रवृत्तीच्या आणि दहशतवाद्यांकडून याचा वापर केला जाण्याची शक्यता आहे.
पॅराग्लायडर्स, पॅरामोटर्स, हॅंग-ग्लायडर्स, मानवरहित विमान, दूरुन संचालित केले जाणारे विमान, गरम हवेचे फुगे, छोट्या आकारांचे यान अथवा यानाचा वापर करून पॅरा जंपिंगचा उपयोग करीत सर्वसामान्य नागरिक, गणमान्य व्यक्ती तसेच महत्वाचे प्रतिष्ठित व्यक्तींच्या सुरक्षेला धोका निर्माण केला जाऊ शकतो.
या अनुषंगाने दिल्ली पोलीस आयुक्त संजय अरोडा यांनी यासंबंधी आदेश जारी केले आहेत. जी-२० संमेलनासाठी राजधानीत येणाऱ्या प्रतिनिधींसाठी तसेच इतर पर्यटकांच्या सुविधेसाठी डिजिटल हेल्प डेस्क बनवण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस दलाकडून देण्यात आली.
न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर