…नाहीतर करोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या मृत्यू दाखल्यांवरही मोदींचा फोटो छापा

पंजाब , ३० एप्रिल २०२१: सध्या संपूर्ण देशभर कोरोनाचे लसीकरण चालू आहे. पण, त्या मध्ये देखील राजकारण होत आहे आणि ती गोष्ट देशासाठी एक दुर्दैवी बाब.करोना लसीकरण केल्यानंतर देण्यात येणाऱ्या प्रमाणपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो असल्याने पंजाबमधील एका व्यक्तीने लस घेण्यास नकार दिलाय.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो जबरदस्तीने या प्रमाणपत्रावर लावण्यात आल्याचा आरोप या व्यक्तीने केलाय. यासंदर्भात या व्यक्तीने राज्याचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांना पत्रही लिहिलं आहे. या घटनेमुळे सामान्य जनतेचा आक्रोश पुन्हा एकदा पहायला मिळत आहे. तर पंजाब मधील प्राध्यापकाने या प्रमाण पत्रावरील मोदींचा फोटो वर तिखट प्रतिक्रिया दिली.

“लसीकरणाच्या प्रमाणपत्रावरील मोदींचा फोटो काढा नाहीतर करोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या मृत्यू दाखल्यांवरही मोदींचा फोटो छापा अशी मागणी केलीय. “चमनलाल असे या प्राध्यापकाचे नाव आहे.तर पुढे त्यांनी आणखी संताप व्यक्त करत आपली प्रतिक्रिया दिली.

मागील सात वर्षांपासून मोदी सत्तेत आहेत. ते प्रत्येक जागी स्वत:ची जाहिरात करताना दिसतात. लसीकरणाच्या प्रमाणपत्रावर पंतप्रधानांच्या फोटोची काय गरज आहे. लसीकरणाच्या प्रमाणपत्रावर मोदींचा फोटो लावला जात असेल तर करोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या मृत्यूच्या दाखल्यांवरही मोदींचा फोटो लावण्यात यावा असंही चमनलाल यांनी वृत्तमाध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.

अशाप्रकारे करोना लसीकरणाच्या प्रमाणपत्रावरुन वाद होण्याची ही काही पहिली घटना नाहीय.पश्चिम बंगालच्या निवडणुकीतही एक मुद्दा गाजला होता.ज्यामधे महाराष्ट्रातील सरकारमधील मंत्री असणाऱ्या नवाब मलिक यांनी मोदींच्या या फोटोसंदर्भातील मुद्दा उपस्थित केला होता.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा