देशात कोरोनाचा उद्रेक,तर ब्राझीलमध्ये तांडव एका दिवसात २००० मृत्यू….

पुणे ११ मार्च २०२१; भारतात कोरोनाचा उद्रेक झाल्याचे पहायला मिळत आहेत.गेल्या २४ तासात देशात तब्बल २२,८५४ नवीन कोरोना रूग्णांची भर पड पडली आहे.१२६ जणांचा मृत्यू झाला आहे.१८,१०० रूग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.देशात या २४ तासात वाढलेल्या कोरोना रूग्णांमुळे एकूण आकडा हा १,१२,८५,५६१ इतका झाला आहे.तर १,९,३८,१४६ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.१,८९,२२६ रूग्णांवर उपचार सुरू आसून १,५८,१८९ रुग्ण या मुळे दगावले आहेत.

देशाबरोबरच राज्याची परिस्थिती ही कोरोना बाबतीत दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे.महाराष्ट्रात १० मार्चला १३,५५९ नवीन कोरोना रूग्ण आढळले.ज्यामुळे राज्याची एकूण कोरोना रूग्णांची संख्या २२,५२,०५७ झाली आहे.तर ५४ जणांचा या विषाणुमुळे मृत्यू झाला आहे.

९,९१३ रूग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आसून ते घरी परतले आहेत.त्यांमुळे आतापर्यंत २०,९९,२०७ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.तर आतापर्यंत ५२,६१० जणांचा मृत्यू झाला आहे.राज्यात सध्या ९९,००८ रूग्ण ॲक्टीव्ह आसून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

ब्राझील मधे २००० मृत्यू……

कोरोनाचा तांडव पुन्हा सुरू झाला आसून अमेरिके नंतर ब्राझील देशाला याचा मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे.जगभरातील देश हे हळूहळू पुर्वपदावर येत आसतानाच कोरोनाच्या नव्या स्ट्रेनने चांगलाच धुमाकूळ घातला आहे.यामुळे ब्राझील मधे एका दिवसात २००० पेक्षा जास्त मृत्यू हे कोरोना मुळे झाल्याचं समोर आले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा