पपईवर व्हायरसचा प्रादुर्भाव….

इंदापूर तालुक्यातील फळ उत्पादक शेतकरी अस्मानी संकटात…

इंदापूर, २६ ऑक्टोबर २०२० :मागील काही महिन्यांपासून इंदापूर तालुक्यातील शेतकरी आसमानी संकटात मधून होरपळून निघत आहे.कोरोना काळामध्ये शेतकऱ्यांच्या शेतमालाला यामध्ये केळी डाळिंब पेरू पपई आदी फळांना कोरोना काळात फटका बसल्याने अगोदरच शेतकरी चिंतेमध्ये असताना आता मात्र इंदापूर तालुक्यातील पपई उत्पादक शेतकऱ्यांवर व्हायरस प्रादुर्भावाने हल्ला केला आहे.

मागील आठवड्यात इंदापूर तालुक्यात अतिवृष्टी मुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती यामध्ये काही शेतकऱ्यांच्या फळबागा फळांसहित वाहून गेल्या तर अनेकांचे प्रचंड नुकसान झाले.त्यातूनच कसेबसे काही फळ उत्पादक शेतकऱ्यांच्या फळबागा राहिल्या होत्या मात्र आता त्यावर व्हायरसने हल्ला चढविला आहे.

बाभुळगाव येथील शेतकरी राजू कांबळे यांनी त्यांच्या शेतात हैवान ७८६ या प्रजातीची निर्यातक्षम पपई लागवड केली आहे. या फळाचे सरासरी वजन एक किलो ते तीन किलोच्या आसपास आहे सध्या निर्यात सुरू झाल्याने या फळाला बाजारामध्ये ३० ते ३५ रुपये प्रति किलो याप्रमाणे दर अपेक्षित आहे या शेतकऱ्याने तीन एकर क्षेत्रावर पपई लागवड केली असून जवळपास यांना त्यातून एकूण शंभर टन माल अपेक्षित असल्याचे कांबळे यांनी सांगितले.

परंतु मागील आठवड्यात झालेली अतिवृष्टी त्यातच व्हायरसचा प्रादुर्भाव यामुळे शेतकऱ्यांपुढे आस्मानी संकट आ वासून उभे राहिले आहे त्यामुळे फळ उत्पादक शेतकर्‍यांनी लाखो रुपये खर्चून जपलेल्या फळबागा आता व्हायरसच्या विळख्यात सापडत आहेत.

त्यामुळे मेटाकुटीला आलेल्या फळ उत्पादक शेतकऱ्यांनी पंचनामे करून प्रशासनाकडे मदतीची मागणी केली आहे.

न्यूज अन कट प्रतिनिधी निखिल कणसे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा