पीओकेमध्ये स्वातंत्र्य निषेध मोर्चात २ ठार, पोलिसांच्या लाठीचार्जातून ८० हून अधिक जखमी

पीओक– स्वातंत्र्य समर्थक रॅली दरम्यान मंगळवारी पीओके च्या मुझफ्फराबादमध्ये आंदोलकांच्या मोठ्या गटासह पोलिसांमध्ये चकमक झाली. या चकमकीत किमान २ लोक ठार झाले. एएनआयच्या अहवालानुसार पीओकेमधील ऑल इंडिपेंडेंट पार्टिस अलायन्स (एआयपीए) अंतर्गत असलेल्या विविध राजकीय पक्षांनी ‘काळा दिवस’ पाळण्यासाठी मंगळवारी मुझफ्फराबाद येथे स्वातंत्र्य समर्थक मेळावा भरवला होता. १९४७ मध्ये याच दिवशी पाकिस्तानी सैन्याने जम्मू-काश्मीरवर आक्रमण केले होते.

आक्रमण दिनाच्या ७२ व्या वर्धापन दिनानिमित्त निदर्शकांनी प्रचंड निदर्शने केली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रू बोंबचे गोळे वापरले आणि लाठीचार्ज केला.

२२ ऑक्टोबर हा पीओके आणि गिलगिट बाल्टिस्तानमधील लोक “ब्लॅक डे” म्हणून साजरा करतात कारण त्यांनी पाकिस्तानला आपला हद्द सोडण्याची मागणी केली होती.

नंतर दुसर्‍या घटनेत पीओकेच्या मुझफ्फराबाद येथील एका प्रेस क्लबवर पोलिसांनी छापा टाकला आणि अनेक पत्रकार जखमी झाले.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा