औरंगाबाद, १ ऑगस्ट २०२० : यंदा राज्यात पावसाचा जोर कमी दिसतोय त्यामध्ये देखील गेल्या काही दिवसा पासून राज्यातील हलक्या सरीमुळे अनेक निसर्ग प्रेमींची पाठ हि फिरण्यासाठी तलाव नद्या धबधबे यांच्या कडे वळली आहे. कोरोना मुळे यंदा सरकारने अनेक पर्यटन स्थाळांवर बंदी घातली आहे. बंदी आसून सुध्दा अनेक लोक हे सरकारच्या नियमांचा फज्जा उडवत फिरायला जात असल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसत आहे. तर यामुळे काही घटना देखील घडत आहेत. आणि अशीच घटना औरंगाबादमध्ये घडली आहे.
औरंगाबादच्या करमाड मध्ये शुक्रवारी ५ तरुण तलवात पोहण्यासाठी गेले असता त्यांचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची दुखद घटना घडली आहे. हे तरुण शेतात कोबी काढण्यासाठी गेले होते आणि घरी परतत आसताना पावसच्या सरीमुळे हिरवळ झालेल्या वातावरणातील तलावात त्यांना पोहण्याचा मोह झाला आणि तो त्यांना आवरता आला नाही. ज्यामुळे ते पोहायला गेले आसता पाण्याचा अंदाज न आल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. सोहेल युसूफ शेख, अतीक युसूफ शेख, अन्सार शेख सत्तार, समीर मुबारक शेख, तालबी शेख अशी मृत्यू झालेल्यांची नावे असून बकरीदच्या पार्श्वभूमिवर झालेल्या या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी