मुंबई, १३ जानेवारी २०२३ :मनोरंजन सृष्टीमधून एक दुःखद बातमी समोर आली आहे. ‘पान सिंह तोमर’ चित्रपटाचे लेखक संजय चौहान यांचे वयाच्या ६२ व्या वर्षी निधन झाले आहे. संजय चौहान यांनी गुरुवारी मुंबईतील एका रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. संजय हे लिव्हर संबंधित आजाराने त्रस्त होते. त्यांचे मागे त्यांनीही पत्नी सरिता आणि मुलगी सारा असा परिवार आहे.
- ‘या’ चित्रपटांसाठी केले लेखन
संजय चौहान यांनी अनेक चित्रपटांसाठी काम केले आहे. त्यांच्या कामाचे नेहमीच कौतुक झाले आहे. संजय चौहान ‘पान सिंह तोमर’ व्यतिरिक्त तिग्मांशू धूलियासह ‘साहेब बीवी गँगस्टर’ हा चित्रपट सुद्धा लिहिला असून, ‘आय एम कलाम’ या चित्रपटासाठी त्यांना तर ‘बेस्ट स्टोरी’साठी फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला आहे. ‘मैने गांधी को नाही मारा’ आणि ‘धूप’ हे त्यांचे प्रसिद्ध चित्रपट आहेत.
संजय चौहान यांचा जन्म मध्य प्रदेशमधील भोपाळमध्ये झाला होता. त्यांचे वडील रेल्वे विभागात होते तर आई शिक्षिका होती. पत्रकारितेच्या क्षेत्रातून सुरुवात करत संजय चौहान पुढे मनोरंजनसृष्टीत आले. त्यांनी १९९० च्या दशकात सोनी टीव्हीसाठी क्राइम बेस्ड सीरीज ‘भंवर’ लिहिली होती. दरम्यान, संजय चौहान यांच्या पार्थिवावर आज दुपारी साडेबारा वाजता मुंबईतील ओशिवरा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.