“बीजमाते” चा पद्मश्री पुरस्काराने सन्मान

10

मुंबई : प्रजासत्ताक दिनानिमित्त देण्यात येणाऱ्या पद्म पुरस्कारासाठी यादी जाहीर करण्यात आली आहे. मराठमोठ्या ‘बीजमाता’ राहीबाई पोपेरे यांना सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित केलं आहे. महाराष्ट्रासाठी ही अभिमानाची बाब आहे.
महाराष्ट्रात बियाणांची बँक चालवणाऱ्या बीजमाता राहीबाई पोपेरे यांच्या कामाची दखल घेण्यात आली आहे. राहीबाईंनी आदिवासी दुर्गम भागात बियाणांची बँक सुरु करुन अनेक देशी वाणांचे जतन केले आहे. त्यांनी शंभरहून अधिक बियाणांच्या वाणाचे जतन केले आहे. राहीबाईंना यापूर्वी ‘नारी शक्ती’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते दिल्लीतील राष्ट्रपती भवनात त्यांचा सन्मान करण्यात आला होता. त्यांनी केलेल्या कामाचा सर्व स्तरातून कौतुक होत होते.
सुप्रसिद्ध पार्श्वगायक सुरेश वाडकर यांनाही ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. सुरेश वाडकरांनी हिंदी आणि मराठीमध्ये शेकडो गाणी गायली आहेत.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा