भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची आज १०२ वी जयंती आहे. या दिवशी त्यांना देशभरातून त्यांना आदरांजली वाहण्यात येते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विट करत त्यांना आदरांजली वाहिली.
इंदिरा गांधींचा जन्म १९१७ मध्ये अलाहाबाद येथे झाला. त्या १९६६ ते १९७७आणि १९८० ते १९८४ या कालावधीमध्ये भारताच्या पंतप्रधान होत्या. इंदिरा गांधींच्या जयंतीनिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
मंगळवारी सकाळी त्यांच्या समधीस्थळावर माजी पंतप्रधान मनमोहनसिंग, माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह प्रमुख नेत्यांना जाऊन आदरांजली वाहिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून इंदिरा गांधींना आदरांजली वाहिली आहे. यासोबतच राहुल गांधींनीही ट्विट केले आहे.
राहुल गांधी म्हणाले की, सशक्त, समर्थ नेतृत्व आणि अद्भुत क्षमता असलेली भारताला एक कणखर देश म्हणून समोर आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारी आयर्नलेडी माझी दादी इंदिरा गांधी यांना जयंतीनिमित्त शुभेच्छा.