कराची, 18 डिसेंबर 2021: पाकिस्तानच्या दक्षिणेकडील कराची येथील सांडपाणी प्रणालीमध्ये काल मोठा वायूचा स्फोट झाला. या अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला असून 13 जण जखमी झाले आहेत. ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
पोलीस आणि आरोग्य अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे. पोलिस प्रवक्ते सोहेल जोखियो यांनी सांगितले की, शहरातील शेरशाह भागात एका बँकेच्या इमारतीखालील गटारात गॅस साचल्यामुळे हा स्फोट झाला.
जोखियो म्हणाले की गॅस आग कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झाले नाही, परंतु स्फोटक तज्ज्ञांच्या पथकाला तपासासाठी पाचारण करण्यात आले आहे. इकडे, कराचीतील ट्रॉमा सेंटरमध्ये डॉ. साबीर मेमन यांनी सांगितले की, या घटनेत 10 जणांचा मृत्यू झाला असून 13 जण जखमी झाले आहेत.
त्यापैकी किमान तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. ते म्हणाले की, अनेक जखमींना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे. स्फोटामुळे आजूबाजूच्या इमारतींच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या आणि जवळ उभ्या असलेल्या एका वाहनाचेही मोठे नुकसान झाले. या प्रकरणी अधिक माहितीची प्रतीक्षा आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे