गोल पोस्ट राष्ट्रीय जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून पुन्हा युद्ध बंदीचे उल्लंघन

जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून पुन्हा युद्ध बंदीचे उल्लंघन

नवी दिल्ली( वृत्तसंस्था) दि.१७ मे २०२०: जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यातील डेगड सेक्टरमध्ये आज (रविवारी) सकाळी पाकिस्तानने पुन्हा युद्धबंदीचे उल्लंघन केल्याचे समोर आले आहे.

याबाबत एएनआय या वृत्तसंसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार पुंछ जिल्ह्यातील डेगड सेक्टरमध्ये सकाळी ८:४० वाजता पाकिस्तानने डेगवार सेक्टरमधील नियंत्रण रेषेवरील युद्धबंदीचा भंग केल्याची घटना घडली असून भारतीय सैन्य पाकिस्तानला प्रत्युत्तर देत आहे.त्यामुळे पाकिस्तानने पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याचे उघड झाले आहे.

या आधीही ९ मेला सुद्धा पाकिस्तानने जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर युद्धबंदीचे उल्लंघन केले होते.
यादिवशी सायंकाळी ७:३० च्या सुमारास, पाकिस्तानी सैन्याने डेगवार सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर गोळीबार सुरू केला होता. भारतीय सैन्याने चोख प्रत्युत्तर दिल्यानंतर पाकिस्तानी सैन्याने माघार घेतली होती.

मात्र आज केलेल्या उल्लंघन केल्याने भारतीय सैनिक याला प्रतिउत्तर देत आहेत. त्यामुळे पाकिस्तानला धडा शिकवणे आता गरजेचे असल्याचे बोलले जात आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी:

error: Content is protected !!
Exit mobile version