भाजप नेत्यांनी पैगंबरांवर केलेल्या वक्तव्यामुळे कतार-कुवेतपाठोपाठ इराणमध्ये संताप, पाकिस्ताननेही घेतला आक्षेप

नवी दिल्ली, 6 जून 2022: कतारनंतर कुवेत, इराण, सौदी अरेबिया आणि पाकिस्ताननेही प्रेषित मोहम्मद यांच्यावर भाजप नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे कतार आणि कुवेतनंतर इराणनेही भारतीय राजदूताला बोलावले आहे. दुसरीकडे, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ म्हणाले की, ‘आमच्या प्रिय पैगंबरांबद्दल भारतातील भाजप नेत्यांनी केलेल्या वक्तव्याचा मी तीव्र निषेध करतो’. दुसरीकडे, भारत सरकारचा अशा विधानांशी काहीही संबंध नसल्याचे भारताकडून सांगण्यात आले आहे.

भारताने इराणला दिले प्रत्युत्तर

या वादग्रस्त वक्तव्यावरून इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने तेहरानमधील भारतीय राजदूताला बोलावून घेतले. बैठकीदरम्यान, भारतीय राजदूताने खेद व्यक्त केला आणि सांगितले की प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल कोणतीही अपमानास्पद टिप्पणी स्वीकार्य नाही. भारत सरकारचा अशा विधानांशी आणि टिप्पण्यांशी काहीही संबंध नाही. भारतात सर्व धर्मांचा आदर केला जातो. अशी टिप्पणी केल्यानंतर नवीन कुमार जिंदाल यांना पक्षातून निलंबित करण्यात आल्याचे भारतीय राजदूत म्हणाले. यासोबतच ते सरकारमध्ये कोणतेही पद भूषवत नाहीत.

पाकचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी व्यक्त केली नाराजी

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी भाजप नेत्यांच्या वक्तव्याचा निषेध केला. त्यांनी ट्विट करून लिहिले की, ‘माझ्या प्रिय पैगंबरांबद्दल भारतातील भाजप नेत्यांच्या वक्तव्याचा मी तीव्र निषेध करतो. मी वारंवार सांगितले आहे की मोदींच्या नेतृत्वाखाली भारत धार्मिक स्वातंत्र्य पायदळी तुडवत आहे आणि मुस्लिमांचा छळ करत आहे. जगाने याकडे लक्ष दिले पाहिजे, असे ते म्हणाले. पवित्र प्रेषितांवरील आमचे प्रेम सर्वोच्च आहे. सर्व मुस्लिम आपल्या पवित्र प्रेषिताच्या प्रेमासाठी आणि आदरासाठी आपल्या प्राणांची आहुती देऊ शकतात.

कुवेत सरकारने या वक्तव्याचा केला निषेध

कुवेतने प्रेषित मोहम्मद यांच्यावर भाजप नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्याबाबत निवेदन जारी केले. अशा टिप्पण्यांचा निषेध करतो. यासोबतच भारताचे राजदूत सिबी जॉर्ज यांनाही समन्स बजावण्यात आले आहे. कुवेतच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या कार्यालयाने अरबी भाषेत एक ट्विट केले आहे. त्यात म्हटले आहे की, कुवेत सरकारने भारताच्या राजदूताला बोलावले आहे. अशा वादग्रस्त विधानांचा आम्ही निषेध करतो. भारतातील सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ कुवेतने राजदूत सिबी जॉर्ज यांना अधिकृत नोटही सुपूर्द केली.

प्रत्युत्तरात, कुवेतमधील भारतीय दूतावासाच्या प्रवक्त्याने एक निवेदन जारी केले की भारतीय राजदूताने कुवेत परराष्ट्र कार्यालयाला सांगितले की वादग्रस्त टिप्पणी भारत सरकारच्या विचारांचे प्रतिबिंबित करत नाही.

कतार – अशी विधाने खपवून घेतली जाणार नाहीत

कतारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने भारतीय राजदूताला बोलावले. त्यांना अधिकृत नोट सुपूर्द केली. प्रेषित मोहम्मद यांच्याबाबत भाजप नेत्यांच्या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो, असे त्यात म्हटले आहे. अशी वक्तव्ये खपवून घेतली जाणार नाहीत, असे कतारने म्हटले आहे. सोबत म्हणाले की, जगभरातील दोन अब्जाहून अधिक मुस्लिम प्रेषित मोहम्मद यांनी दाखवलेल्या मार्गाचे अनुसरण करतात. अशा टिप्पण्या धार्मिक द्वेषाला उत्तेजन देतील.

कतारच्या परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनाला उत्तर देताना कतारमधील भारतीय दूतावासाच्या प्रवक्त्याने सांगितले की, भारतीय राजदूतांची परराष्ट्र कार्यालयात बैठक झाली. यामध्ये वादग्रस्त वक्तव्ये आणि ट्विटबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली होती. सोबत असे म्हटले आहे की, असे ट्विट भारत सरकारचे मत दर्शवत नाहीत.

आता सौदी अरेबियाने म्हटले आहे की परराष्ट्र व्यवहार मंत्रालय भाजपच्या प्रवक्त्याच्या विधानाचा निषेध करते, ज्यामध्ये प्रेषित मुहम्मद यांचा अपमान करण्यात आला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा