पाकिस्तानने केली टी-२० संघाची घोषणा

12

इस्लामाबाद, २२ ऑगस्ट २०२०: युवा वेगवान गोलंदाज नसीम शाहचा इंग्लंडविरुद्ध २८ ऑगस्टपासून सुरू होणार्‍या तीन टी -२० आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी पाकिस्तानच्या १७ सदस्यीय संघात समावेश केला गेला आहे. १७ वर्षीय वेगवान गोलंदाज नसीम शाहने आतापर्यंत सहा कसोटी सामने खेळले आहेत, परंतू अद्याप पाकिस्तानकडून त्याने मर्यादित षटकांचे सामने खेळलेले नाहीत.

नसीम शिवाय पाकिस्तानने १९ वर्षाचा फलंदाज हैदर अलीचा देखील समावेश केला आहे. त्याने १९ वर्षांखालील क्रिकेट, प्रथम श्रेणी क्रिकेट आणि पाकिस्तान सुपर लीगमध्ये चांगली कामगिरी केली आहे. बाबर आझम संघाचे नेतृत्व करणार आहेत. माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक फलंदाज सरफराज अहमदलाही संघात घेण्यात आले आहे. मोहम्मद आमिर, वहाब रियाज आणि फखर जमान यांचे संघात पुनरागमन झाले आहे.

पाकिस्तानचा टी -२० संघ-
बाबर आझम (कॅप्टन), फखर जमान, हैदर अली, हरीस रऊफ, इफ्तिखार अहमद, इमाद वसीम, खुशदिल शाह, मोहम्मद हफीज, मोहम्मद हसनन, मोहम्मद रिझवान, मोहम्मद आमिर, नसीम शाह, सरफराज अहमद, शादाब खान, शाहीन शाह आफ्रिदी, शोएब मलिक आणि वहाब रियाज.

न्यूज अनकट प्रतिनिधी