पुणे, ८ ऑक्टोबर २०२२: जगातील सर्वोत्तम संघापैकी एक असलेल्या भारतीय महिला क्रिकेट संघाला काल आशिया चषक टी-ट्वेंटी सामन्यात पाकिस्तानकडून १३ धावांनी पराभव पत्करावा लागला आहे. या पराभवामुळे भारतीय संघाची या स्पर्धेतील आणि पाकिस्तानी विरुद्धची विजयी मालिका खंडित झाली आहे. भारताने यंदाच्या आशिया चषक स्पर्धेत सलग तीन सामने जिंकले होते, तसेच या दोन संघांमध्ये गेल्या पाचही टी ट्वेंटी सामन्यात भारताने विजय नोंदवला होता.
प्रथम फलंदाजी करताना निदा दारच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर पाकिस्तान महिला संघाने भारताविरुद्ध ६ बाद (१३७) धावाच करू शकला, प्रतिउत्तरात भारताचा डाव १९.४ षटकात (१२४) धावातच आटोपला.
या सामन्यात पाकिस्तान महिला संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला, पाकिस्तानकडून निदा दारच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर आणि कर्णधार बिस्माह मारुफ याच्या महत्वपूर्ण ७६ धावांच्या भागिदारी मुळे, पाकिस्तान संघ ६ बाद १३७ पर्यंत पोहोचले.
प्रतिउत्तरात फलंदाजी उतरलेला भारताचा अर्धा संघ ७० धावतच तंबूत परतला. टीम इंडियाकडून रीचा घोष हीने सर्वाधिक २६ धावा केल्या, तिच्या व्यतिरिक्त दुसरा कोणताही फलंदाज पाकिस्तान गोलंदाज समोर टिकू शकला नाही.
न्यूज अनकट प्रतिनिधी – अंकुश जाधव