दलदलीतला पाकिस्तान …
आर्थिक टंचाईमध्ये पाकिस्तान …

पुणे, १८ जुलै २०२२: सध्या पाकिस्तानची परिस्थिती अतिशय हालाखीची झाली आहे. ज्यात पाकिस्तानचे हाल कुत्र देखील खाणार नाही, अशी सद्यस्थिती आहे.


पाकिस्तानला आता आर्थिक पाठबळीची गरज आहे. ज्यात आता मित्रदेशांकडून पाकिस्तानला चार बिलियन डॉलरची मदत मिळणार असून त्यावर पाकिस्तानची गुजराण होणार आहे.
यावर पाकिस्तानचे पंतप्रधान यांनी सांगितलं की, आम्ही नक्की यातून बाहेर येऊ. परदेशातून आम्हाला ऑईल पुरवठा मिळेल तर इतर देशांकडून गॅसही मिळेल.

आर्थिक विश्लेषणानुसार पाकिस्तानच्या परकीय चलनाच्या साठ्यात घट झाली असल्याने पाकिस्तानवर कर्जाचा बोजा वाढत आहे. त्यामुळे त्यांच्या तिजोरीवर भार पडलेला आहे. त्यात जगाच्या आर्थिक मंदीमुळे पाकिस्तानमध्ये कमाईचे मार्ग अतिशय कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. ज्यामुळे उत्पन्नाची साधने कमी होत आहे.

यातच देशाची आर्थिक स्थिती पाहून इतर देशांनी गुंतवणूक करण्यासाठी हात आखडता घेतला आहे. ज्यामुळे दळण-वळण पूर्णपणे ठप्प झाले आहे. पाकिस्तानचा परकीय चलनाचा साठा हा १० अब्ज डॉलरच्या खाली गेला आहे. देशातील महागाईचा दर हा २० टक्क्यांच्या पुढे गेला आहे. डॉलरच्या तुलनेत पाकिस्तानचा रुपया घसरला असून तो २०० रुपयांच्या वर गेल्याने पाकिस्तान आर्थिक टंचाईतून जात आहे. अनेक देशांतल्या व्यापा-यांनी पाकिस्तानबरोबर व्यापारी संबध संपुष्टात आणल्याने कमाईचे मार्ग बंद झाले आहेत. त्यामुळे आता पाकिस्तानची अवस्था ना घर का ना घाट का… अशी झाली आहे. रेटिंग एजन्सींनी पाकिस्तानचे रेटिंग कमी केल्याने पाकिस्तान आता डबघाईला जात असल्याचे दिसून येत आहे. आता श्रीलंकेनंतर पाकिस्तानही लयाला जात आहे, असं म्हंटल्यास वावगं ठरणार नाही.

न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा