इस्लामाबाद, १३ डिसेंबर २०२०: पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आपल्या मंत्रिमंडळात फेरबदल केला आहे. त्यांनी आता रेल्वेमंत्री शेख रशीद यांना गृहमंत्री केले आहे. हा तोच शेख रशीद आहे जो आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत आहे. रेल्वेमंत्री असताना त्यांनी एकदा असेही म्हटले होते की आम्ही भारतावर अणुबॉम्ब टाकू.
वास्तविक, डॉन ने दिलेल्या वृत्तानुसार, एजाज शहा यांच्याकडून गृह मंत्रालय घेतल्यानंतर त्यांना नारकोटिक्स विभागात नियुक्त केले गेले आहे. आझम खान स्वाती आता नवीन रेल्वेमंत्री असतील. अब्दुल हाफिज शेख हे पहिले आर्थिक सल्लागार होते, आता त्यांना हे मंत्रालय देण्यात आले आहे.
शेख रशीद हे त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे ओळखले जातात. रेल्वेमंत्री शेख रशीद यांनी पाकिस्तान कडे १२५ ते २५० ग्रॅम पर्यंतचे छोटे अणुबॉम्ब असल्याचे सांगितले होते. या बॉम्बद्वारे पाकिस्तान सहज भारताला लक्ष्य करू शकतो. भारताला धमकी देताना ते म्हणाले की, पाकिस्तानकडेही पाव आणि अर्धा पाव वजनाचे अणुबॉम्ब असून ते एखाद्या विशिष्ट भागाला लक्ष्य करू शकतात हे भारताने लक्षात घेतले पाहिजे.
त्यांनी बर्याच वेळा आपले सरकार आणि पाकिस्तानची नाचक्की केली आहे. इतकेच नाही तर ऑगस्ट २०१९ मध्ये त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये ते पंतप्रधान मोदींचे नाव घेत होते आणि त्यांच्या माइक मध्ये करंट उतरून त्यांना शॉक लागला होता. याशिवायही ते अनेक वेळा भारताला आपल्या भाषणांमध्ये लक्ष करताना दिसले आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे