पाकिस्तान हादरले! माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर जीवघेणा हल्ला

इस्लमाबाद, ३ नोव्हेंबर २०२२ : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर पाकिस्तानतल्या एका रॅलीत एके-47 रायफलमधून गोळीबार करण्यात आला असल्याची माहिती मिळाली आहे. गुजरानवाला या ठिकाणी रॅली सुरू असताना इम्रान खान यांच्यावर गोळीबार करण्यात आला. यानंतर इम्रान खान यांना तातडीने लाहोरमधल्या रूग्णालयात रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच या हल्ल्यात इम्रान खान यांच्यासोबत असलेल्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर सात जण जखमी झाले आहेत अशी माहितीही समोर येते आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वझिराबादमधील चौकात ही रॅली सुरु असताना हा हल्ला झाला. यामध्ये इम्रान खान यांच्यासह ७ जण जखमी झाले आहेत, तर एकाचा मृत्यू झाला. जखमींमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. या हल्ल्यात इम्रान खान यांच्या पायाला दुखापत झाली असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे.

हल्ल्यामध्ये इम्रान खान यांचे सहकारी आणि पीटीआयचे नेते फैजल जावेद हे देखील जखमी झाले आहेत. पीटीआय नेते फवाद चौधरी यांनी सांगितले की, हल्लेखोरांनी इम्रान खान यांच्यावर एके-47 रायफलमधून गोळ्या झाडल्या. हा ‘लक्ष्य हल्ला’ होता, असे ही त्यांनी म्हटले आहे.

हल्लेखोर पकडला :

पाकिस्तानी मीडियानुसार, गोळीबार करणाऱ्या व्यक्तीला आजूबाजूच्या लोकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याची ओळख पटवली जात आहे. इमरान यांच्या पक्षालाही या हल्ल्यामागे विरोधी पक्षांचा हात असण्याची भीती आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा