‘ऑस्ट्रेलियात’ होणाऱ्या टी ट्वेंटी विश्वचषक २०२२ साठी पाकिस्तान संघाची घोषणा

12

पुणे, १६ सप्टेंबर २०२२ : ऑस्ट्रेलियामध्ये १६ ऑक्टोबरपासून टी ट्वेंटी विश्वचषक २०२२ च्या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी पाकिस्तानने गुरुवारी आपला संघ जाहीर केला आहे. बाबर आझमच्या नेतृत्वाखाली बोर्डाने २०२२ च्या टी ट्वेंटी विश्वचषकासाठी १५ जणांचा संघ जाहीर केला आहे .या संघात वेगवान गोलंदाज शाहिन शहा आफ्रिदीचा समावेश आहे. जो दुखापतीमुळे २०२२ आशिया चषक स्पर्धेतून बाहेर पडला होता.

आशिया चषक २०२२ पूर्वी शाहीन शहा आफ्रिदी उजव्या गुडघ्याच्या दुखापतीमुळे बाहेर पडला होता. त्याच्या बाहेर पडल्यामुळे भारतीय संघाला आशिया चषका मध्ये मोठा दिलासा मिळाला होता. तर डावखुरा फलंदाज शान मसूदचा संघात समावेश केला आहे. महसूदने यावर्षी इंग्लंडपासून पाकिस्तानपर्यंत वेगवेगळे स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी केलेली आहे.

टी २० वर्ल्डकप साठी पाकिस्तान टीम

बाबर आजम ,(कॅप्टन ) शादाब खान, मोहम्मद रिजवान, मोहम्मद वसीम, नसीम शहा, शाहीन शहा आफ्रिदी, शान मसूद, उस्मान कादिर, मोहम्मद नवाज, मोहम्मद हुसेन, खुश दिल शहा, इफतीखार अहमद, हरिस रऊफ, हैदर अली, असिफ अली

राखीव खेळाडू : मोहम्मद हरिस, फखर जमान ,आणि शहानवाज दहानी.

स्फोटक फलंदाज ‘फखर जमान’ याला मुख्य संघातून बाद केले आहे. त्याला राखीव खेळाडूंमध्ये जागा देण्यात आली आहे. पाकिस्तानने बहुतांश खेळाडूंना कायम ठेवले आहे. दुखापतीमुळे बाहेर असलेल्या वेगवान गोलंदाज शाहिन शहा आफ्रिदी आणि मोहम्मद वसीम चे पुनरागमन झाले आहे.

या स्पर्धेत पहिलाच सामन्यात पाकिस्तान संघाला भारताचे ‘ आव्हान’ असेल २३ ऑक्टोबरला दोन्ही संघांमधील हा सामना मेलबर्नमध्ये होणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अंकुश जाधव