इंग्लंड विरुध्द पाकिस्तान ३ रा टी-२० सामना: पाकिस्तान संघाचा ५ धावांनी विजय..

मँचेस्टर, २ सप्टेंबर २०२०: इंग्लंड विरुध्द पाकिस्तान यांच्यात झालेल्या तिसऱ्या आणि अंतिम टी-२० सामन्यामध्ये पाकिस्तान संघाने इंग्लंड संघावर दणदणीत विजय मिळवला आहे. प्रथम फलंदाजी करत असताना पाकिस्तान संघाने इंग्लंड संघासमोर २० षटकांमध्ये १९० धावांचे लक्ष्य ठेवले यात पाकिस्तान संघाचाचा स्टार फलंदाज मोहम्मद हाफिझ याने ५२ चेंडूत ४ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने ८६ धावांची उत्कृष्ट खेळी केली.या खेळीमुळेच पाकिस्तान संघाला १९० पर्यंत मजल मारता आली .

तसेच या सामन्यात पाकिस्तानसाठी पदार्पण करणारा अंडर १९ संघाचा खेळाडू हैदर अली याने अर्धशतक झळकावले. तसेच हैदर अली आणि मोहम्मद हाफिझ यांच्यात १०० धावांची भागीदारी झाली. तर दुसरीकडे इंग्लंड संघाकडून ६० धावांची खेळी करत मोईन अली याने इंग्लंड संघाला विजयाच्या जवळ नेले.

परंतू इंग्लंड संघाला विजय मिळवून देता आला नाही. इंग्लंडचा संघ २० षटकांमध्ये ८ गडी बाद १८५ धाव करू शकला आणि पाकिस्तान संघने हा सामना ५ धावांनी जिंकला . तसेच पाहिला सामना पावसामुळे अनिर्णित ठरला आणि दुसऱ्या सामन्यात इंग्लंड संघाला विजय मिळाला होता. तसेच आता पाकिस्तान संघाने विजय मिळवत ३ सामन्यांची टि-२० मालिका १-१ ने बराबरी वर समाप्त केली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अंकुश ढावरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा