आर्थिक तंगीचा सामना करतोय पाकिस्तान, पंतप्रधानांचं घर भाड्यानं देणार

8
इस्लामाबाद, ५ ऑगस्ट २०२१: पंतप्रधान इम्रान खान यांचं अधिकृत निवासस्थान भाड्यानं देणं आहे.  होय, आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या पाकिस्ताननं इस्लामाबादमधील पंतप्रधान इम्रान खान यांचं अधिकृत नि,वासस्थान सामान्य लोकांना भाड्यानं देण्याचा निर्णय घेतलाय.  आता लोक सांस्कृतिक, फॅशन आणि शैक्षणिक कार्यक्रमांसह इतर कार्यक्रमांसाठी इम्रान खान यांचं अधिकृत निवासस्थान भाड्यानं घेऊ शकतील.
 यापूर्वी ऑगस्ट २०१९ मध्ये, जेव्हा सत्ताधारी तेहरिक-पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) सरकार स्थापन झालं, तेव्हा पंतप्रधान इम्रान खान यांनी सरकारी निवासस्थान विद्यापीठात बदलण्याची घोषणा केली होती.  यानंतर इम्रान खान यांनी ते रिकामं केलं.  समा टीव्हीनं वृत्त दिलं की, सरकारनं आता विद्यापीठ प्रकल्पाकडं पाठ फिरवलीय आणि पंतप्रधान निवास भाड्यानं देण्याचा निर्णय घेतलाय.
 राजनैतिक कार्ये, आंतरराष्ट्रीय चर्चासत्रे देखील आयोजित केली जातील
 स्थानिक माध्यमांनुसार, या प्रकरणी लवकरच इम्रान मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे, ज्यामध्ये पंतप्रधानांच्या सरकारी निवासस्थानातून महसूल मिळवण्याच्या मुद्यावर चर्चा केली जाईल.  पंतप्रधान निवासस्थानाचे ऑडिटोरियम (सभागृह), दोन गेस्ट विंग आणि लॉन भाड्यानं देऊन महसूल गोळा केला जाईल असं सांगितलं जात आहे.  या कॅम्पसमध्ये राजनैतिक कार्ये, आंतरराष्ट्रीय चर्चासत्रं देखील आयोजित केली जातील.  सरकार अशा कार्यक्रमांमधून भाडं गोळा करून देखील कमवेल.
  आमच्याकडे जनतेसाठी पैसा नाही
  जेव्हा इम्रान खान यांनी २०१९ मध्ये देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली होती, तेव्हा त्यांनी स्वतः सांगितलं होतं की, पाकिस्तान सरकारकडं लोककल्याणकारी योजनांवर खर्च करण्यासाठी पैसा नाही, तर देशातील काही लोक ऐशोआरामात जगत आहेत.  तेव्हापासून ते त्यांच्या बानी गाला निवासस्थानी राहत आहेत आणि फक्त पंतप्रधान कार्यालयाचा वापर करत आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा