तालिबान शांतता चर्चेत आलेल्या अडचणींबाबत पाकिस्तान जबाबदारी घेणार नाही: कुरेशी

इस्‍लामाबाद, १६ जून २०२१: अफगाणिस्तान शांतता चर्चेत व्यत्यय आणि वाढत्या तालिबानी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने यासंदर्भात कोणतीही जबाबदारी घेणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. पाकिस्तान चे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी पाक-अफगाण चर्चेदरम्यान तेथे उपस्थित जनतेला संबोधित करताना ते म्हणाले की, अफगाणिस्तानात शांतता चर्चेत अडथळा आणण्याचा किंवा समस्या निर्माण करण्याचा पाकिस्तान वर आरोप केला तर पाकिस्तान कधीही जबाबदारी घेणार नाही.

अफगाणिस्तानाचे अध्यक्ष अशरफ गनी लवकरच अमेरिकेच्या दौर्‍यावर येणार आहेत. या दौऱ्यात त्यांचे जवळचे लोकही सामील होतील. अफगाणिस्तान शांतता चर्चेसाठी या चर्चा फार महत्वाच्या मानल्या जातात. या चर्चेच्या अगोदर कुरेशी यांनी राष्ट्रपती गनी यांना या भेटीची शुभेच्छा देताना असेही म्हटले होते की, आम्ही चर्चा सुरू होण्या अगोदरच स्पष्ट करत आहोत की जर या चर्चेदरम्यान अमेरिका संपूर्ण प्रक्रियेसाठी किंवा त्याबद्दल पाकिस्तानला दोष देत असेल तर पाकिस्तान कोणत्याही प्रकारे मदत करणार नाही.

ते म्हणाले की, ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. यात जर काही चूक झाली तर फक्त पाकिस्तानलाच त्यासाठी जबाबदार धरता येणार नाही. आम्ही यासाठी कोणतीही जबाबदारी घेणार नाही. पाक-अफगाण संवादात ते म्हणाले की अफगाण शांतता चर्चेबाबत पाकिस्तान पूर्णपणे प्रामाणिक आणि गंभीर आहे. आता यावरून पाकिस्तानवर आरोप करणे थांबवले पाहिजे.

या संवादामध्ये पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी अफगाणिस्तानवरच अफगाणिस्तानच्या शांतता चर्चेत येणारा अडथळा किंवा अडचणी यांचा आरोप इशाऱ्या ईशाऱ्यात लावला आहे. ते म्हणतात की अफगाणिस्तानला ते देशाला कसे पुढे आणता येईल हे ठरवायला हवे होते. त्यासाठी अफगाणिस्तानलाच व्यक्तींची निवड करावी लागणार आहे. अफगाणिस्तानला अशा एका नेतृत्वाची गरज आहे जे यशस्वीपणे तालिबानशी वाटाघाटी करू शकते आणि देशात शांतता बहाल करेल, सत्तेत राहण्याची चिंता करू नका.

कुरेशी म्हणाले की, पाकिस्तानला अफगाणिस्तानचा सहयोगी व्हायचे आहे आणि त्याच वेळी दहशतवादाविरूद्ध अमेरिकेला सहकार्य करायचे आहे, परंतु याची किंमत पाकिस्तानला मोजावी लागली आहे, ज्यामुळे पाकिस्तानला आपले अनेक जवान गमवावे लागले आहेत, मशिदी मध्ये बॉम्ब स्पोर्ट आणि घसरत्या अर्थव्यवस्थेचा सामना करावा लागला आहे. त्यांच्या मते ते पाकिस्तानचे निवडलेले प्रतिनिधी आहेत आणि ते पाकिस्तानात तालिबानीकरण पाहू इच्छित नाही. यावेळी त्यांनी स्पष्ट केले की अफगाणिस्तानाच्या अंतर्गत कामात पाकिस्तान हस्तक्षेप करणार नाही. ते म्हणाले की पाकिस्तान हा कोणाचाच आवडता नाही. सर्वत्र अशी धारणा आहे की पाकिस्तान तालिबानचे समर्थन करतो. परंतु प्रत्यक्षात तसे काहीही नाही.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा