पाकिस्तान, २० ऑगस्ट २०२०: आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असलेले पाकिस्तानचे रेल्वेमंत्री शेख रशीद यांनी भारता विरूद्ध अणुबॉम्ब वापरण्याची धमकी दिली आहे. शेख रशीद यांनी म्हटले आहे की, पाकिस्तानकडे आसाममध्ये लक्ष साधणारे अणुबॉम्ब आहेत. एवढेच नव्हे तर शेख रशीद यांचे म्हणणे आहे की या अणु हल्ल्यांमध्ये मुस्लिमांचे नुकसान होणार नाही.
शेख रशीद म्हणाले की, भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध झाले तर ते रक्तरंजित आणि अंतिम युद्ध असेल. पाकिस्तानच्या रेल्वेमंत्र्यांनी सांगितले की, हिंदुस्थानने पाकिस्तानवर हल्ला केला तर कन्वेन्शन वॉरला वाव राहणार नाही. इम्रान खानचे मंत्री म्हणाले की आमचे हथियार मुसलमानांना धक्काही न लावता आसामपर्यंत वार करण्याची क्षमता ठेवते.
शेख रशीद यांनी प्रथमच ही धमकी दिली नाही. यापूर्वीही त्यांनी बर्याच वेळेस असे विधान केले होते. यापूर्वी त्यांनी भारताचे नाव न घेता अणु युद्धाची धमकी दिली होती. शेख रशीद म्हणाले की, आता युद्ध पारंपारिक मार्गाने होणार नाही, तर अणु युद्ध असेल. एका प्रश्नाला उत्तर देताना शेख रशीद म्हणाले की यापुढे असे युद्ध होणार नाहीत की रणगाडे, तोफ चालतील तर थेट अणु युद्ध होईल.
शेख रशीद म्हणाले होते की पाकिस्तानकडे १२५ ग्रॅम आणि २५० ग्रॅमचे अणुबॉम्ब आहेत जे एका विशिष्ट लक्ष्यावर मारा मारू शकतात. पाकचे रेल्वेमंत्र्यांनी म्हटले होते की, पाकिस्तानकडेही पावशेर आणि अर्धा किलोचे अणुबॉम्ब असून ते एखाद्या विशिष्ट भागाला लक्ष्य करू शकतात, हे भारताने ऐकले पाहिजे. शेख रशीद यांचे विधान सोशल मीडियावरही व्हायरल झाले आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी