गोल पोस्ट राष्ट्रीय पाकिस्तानाच्या खुरापती पुन्हा सुरु,भारताचे ही चोख उत्तर

पाकिस्तानाच्या खुरापती पुन्हा सुरु,भारताचे ही चोख उत्तर

श्रीनगर ,१० जुलै २०२० : संपूर्ण जगावर कोरोना माहामारीचे संकट आसताना पाकिस्तान मात्र आपल्या खुरापती मात्र कमी करताना दिसत नाहीये.पाकिस्तानातील नागरिक है या कोरोना व्हायरसमुळे असाह्य हतबल झालेत तर प्रशासना वर संताप व्यक्त करातायत पण तेथील सरकार है तेथील स्थानिक समस्या न सोडवता भारताला सीमेवर आश्या पद्धतीेने त्रास देत आहेत.पण भारताच्या सीमेवरील जवान देखील त्यांना त्यांच्याच भाषेत प्रतिउत्तर देत आहेत.

पाकिस्तानने शुक्रवारी सीजफायर उल्लंघन करून केलेल्या ह्या गोळीबारात भारताचा एक जवान शहीद झाला. राजौरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्टरमध्ये युद्धबंदीचे उल्लंघन करत पाकिस्तानने पुन्हा एकदा गोळीबार केला. भारतीय सैन्यानेही या गोळीबारास प्रत्युत्तर दिले आहे.

पाकिस्तानी लष्कराच्या गोळीबारात भारतीय सैन्याचा एक जवान शहीद झाल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार शहीद झालेल्या जवानांचे नाव हवालदार सांबर गुरुंग हे गंभीर जखमी झाले.त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले परंतु उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर अली.

मागील काही दिवसांपासून पकिस्तानकडून अश्या प्रकारच्या घटना सुरूच आहेत. याआधी देखील पाकिस्तानी सैन्यकडून सीमेवर असलेल्या भारतीय लष्कराच्या चौक्यांना लक्ष्य करत गोळीबार केला होता. २२ जूनला पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या अश्याच गोळीबारात एका भारतीय जवान देखील शहीद झाला होता.

न्यूज अनकट प्रतिनिधी

error: Content is protected !!
Exit mobile version