गोल पोस्ट राष्ट्रीय पाकिस्तानी जवानांनी भारतीय सैनिकाचे शीर कापून नेले पळवून

पाकिस्तानी जवानांनी भारतीय सैनिकाचे शीर कापून नेले पळवून

जम्मू काश्मीर : नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी लष्कराच्या कुरघोड्या करणे सुरूच आहेत. पाकिस्तानच्या बॉर्डर ऍक्शन टीमच्या (बॅट) जवानांनी शनिवारी रात्री नियंत्रण रेषेवर तुफान गोळीबार केला आणि त्यात शहीद झालेल्या भारतीय जवानाचे शीर कापून पाकिस्तानात पळवून नेले असल्याची माहिती समोर येत आहे.
नियंत्रण रेषेवर पूँछ जिल्ह्यात हा निंदनीय प्रकार घडला.
पाकिस्तानच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार केला गेला. त्यात भारतीय लष्करातील एक पोर्टर शहीद झाला तर दोन नागरिक मृत्युमुखी पडले. इतकेच करून पाकिस्तानी ‘बॅट’ थांबले नाहीत ते नियंत्रण रेषेवर शहीद झालेल्या हिंदुस्थानी जवानाच्या शवाजवळ आले आणि त्यांनी त्याचे शीर कापून पाकिस्तानात नेले. लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी पाकिस्तानच्या या भ्याड कृत्याला योग्य प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा दिला आहे.

तीन दहशतवाद्यांना घातले कंठस्नान
दक्षिण कश्मीरच्या पुलवामा जिह्यातील त्राल येथे गुलशनपोरा भागात आज सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. त्या चकमकीत हिजबूल मुजाहिदीनचे दहशतवादी उमर फैयाज लोन, आदिल बशीर मीर आणि जैश-ए-मोहम्मद संघटनेचा दहशतवादी अहमद भट्ट अशा तिघांना सुरक्षा जवानांनी कंठस्नान घातले.

error: Content is protected !!
Exit mobile version