युनायटेड नेशन्स मध्ये पाकिस्ताननं भारतावर लावलेले आरोप, भारताचं चोख प्रत्युत्तर

नवी दिल्ली, २६ सप्टेंबर २०२०: कोरोना विषाणूच्या संकटामुळं या वेळी युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीचे आभासी पद्धतीनं आयोजन केलं जात आहे. या दरम्यान पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनीही महासभेला संबोधित केलं. त्याच वेळी, जेव्हा इम्रान खान बोलू लागले, तेव्हा यूएन जनरल असेंब्ली हॉलमध्ये उपस्थित भारतीय प्रतिनिधी बाहेर पडले. यादरम्यान इम्रान खान यांनी भारतावर भाष्य केलं.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी संयुक्त राष्ट्र महासभेच्या अधिवेशनाला संबोधित केले. या दरम्यान पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारतावर अनेक आरोप केले. त्याचवेळी जेव्हा पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी यूएनमध्ये भाषण सुरू केले तेव्हा भारताने त्यावर बहिष्कार टाकला. या दरम्यान, यूएन जनरल असेंब्ली हॉलमध्ये उपस्थित भारतीय प्रतिनिधी टीएस तिरुमूर्ती बाहेर पडले.

संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी प्रतिनिधी टीएस तिरुमूर्ती म्हणाले की, ७५ व्या संयुक्त राष्ट्र महासभेतील पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी केलेलं विधान नवीन राजनैतिकदृष्ट्या निम्न पातळीचं आहे. त्यांच्या निवेदनामध्ये खोटे, वैयक्तिक हल्ले आहेत ज्यामध्ये पाकिस्तानमधील अल्पसंख्यांकांचा छळ आणि सीमावर्ती दहशतवादा कडे दुर्लक्ष करत भारतावर भाष्य करणं या गोष्टींचा समावेश आहे.

भारताने प्रत्युत्तर दिलं

त्याचवेळी भारतानंही पाकिस्तानला प्रत्युत्तर दिलं. संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेच्या अधिवेशनात भारतानं पाकिस्तानला असं उत्तर दिलं की, दहशतवादाचे केंद्र म्हणून ओळखल्या जाणार्‍या देशाकडून जगाला मानवाधिकारांवर धडे घेण्याची गरज नाही.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा