“त्या” हल्ल्यामागे पाकिस्तानचाच हात: सय्यद सलाहुद्दीन

8

नवी दिल्ली, दि१० मे २०२० : जम्मू काश्मीर मधील हंदवाडा येथे केलेल्या दहशतवादी हल्ल्याच्या मागे पाकिस्थानचा हात असल्याची कबुली हिजबुल मुजाहिद्दीनचा प्रमुख सय्यद सलाहुद्दीन याने दिली आहे.

हिजबूलचा कमांडर रियाज नायकू याला सुरक्षा रक्षकांनी ६ मे रोजी मारण्यात आले होते. त्यासाठी सलाहुद्दीने त्याच्या शोकसभेचे आयोजन केले होते. त्या शोकसभेचा व्हिडीओ अमेरिकेकडून प्रसिद्ध करण्यात आला आहे.

या व्हिडिओवरून सलाहुद्दीन याला आंतराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करण्यात आले असून तो पाकिस्तानात असल्याचे या व्हिडिओवरून सिद्ध झाले आहे. या व्हिडिओमध्ये सलाहुद्दीन हा नायकूची प्रशंंसा करताना पहायला मिळत आहे. हंदवाडा एन्काउंटरमध्ये पाच जवान शहीद झाले होते.मात्र पाकिस्तानच्या कमकुवत धोरणामुळे भारताचं पारडे जड असल्याचे त्याने यावेळी म्हटले आहे. याबाबत एका इंग्रजी वृत्तपत्राने हे वृत्त दिले आहे.

रियाझ नायकू हा गेल्या काही दिवसांपासून काश्मीर खोऱ्यामध्ये दहशतवाद पसरविण्याचे काम करत होता. त्याच्यावर १२ लाखांचे बक्षीसही ठेवण्यात आले होते. पोलीस आणि सुरक्षा दलाला लक्ष्य करत त्याने काश्मीरमध्ये अनेक मोठ्या कारवाया देखील केल्या होत्या. मात्र दक्षिण काश्मीरमध्ये सुरक्षा दलाशी झालेल्या चकमकीत रियाझ मारला गेला.

न्युज अनकट प्रतिनिधी: