गोल पोस्ट राजकारण पक्ष बदलणाऱ्या दिग्गजांची झाली गोची

पक्ष बदलणाऱ्या दिग्गजांची झाली गोची

मुंबई : लोकसभा निवसडणुकीपासून आघाडीला चांगलीच गळती लागली हाती. त्यामुळे विधानसभेच्या पार्श्वभूमीवर अनेक दिग्गज नेत्यांनी पक्षांतर केले. आणि भाजप आणि शिवसेनेत प्रवेश केला. मात्र सध्या राजकीय समीकरणे क्षणाक्षणाला बदलताना दिसत आहे. त्यामुळे ज्यांनी पक्षांतर केले. त्या नेत्यांची आता चांगलीच गोची होणार असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.

राष्ट्रवादी-काँग्रेस पक्षातील अनेक बड्या नेत्यांनी दिमाखात पक्षांतर करुन स्वपक्षाला धक्का देत भाजप- शिवसेनेत गेले असले तरी दोन्ही पक्षांना सत्तास्थापन करण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे पक्षांतर केलेल्या नेत्यांची परिस्थिती ‘ना घर का ना घाट का’ अशी झाली आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीतुन राधाकृष्ण विखे पाटील, गणेश नाईक, शिवेंद्रराजे भोसले, भास्कर जाधव, अब्दुल सत्तार, रश्मी बागल, नारायण राणे, दिलीप सोपल, संजय मामा शिंदे, रणजितसिंह मोहिते-पाटील, नमिता मुंदडा, संजय दिना पाटील, अवधुत तटकरे, राणा जगजितसिंह या सारख्या दिग्गज नेत्यांनी स्वपक्षाला सोडचिठ्ठी देत भाजप-शिवसेनेत प्रवेश केला.
सध्याच्या परिस्थितीतमध्ये राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडीचे सरकार येणार असल्याची चिन्हे दिसून येत असल्याने सत्तांतर केलेल्या नेत्यांची चांगलीच गोची झाली आहे. भाजपने मेगाभरतीच्या माध्यमातून अनेक दिग्गज नेत्यांना आपल्या पक्षात घेतले. पक्ष बदलून भाजपवासी झालेल्या नेत्यांना पक्षाकडून अनेक अपेक्षा होत्या. सत्तेत येणार असल्याची शाश्वती होती. मात्र, आता उलट परिस्थिती निर्माण झाली आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version